शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:55 IST

आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत.

आष्टा (जि.सांगली) : सैन्य दलात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून आष्टा परिसरातील सहा तरुणांना ३० लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया नाैदल अधिकारी आकाश काशीनाथ डांगे  यास आष्टा पोलिसांनी  अटक केली. बहादूरवाडी येथील नितीन दळवी हा सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत होता. चार वर्षांपूर्वी एका सेवानिवृत्त जवानामुळे त्याची आकाश डांगेसोबत ओळख झाली. सैन्यात भरतीबाबत त्याने ग्वाही दिली. यानंतर, आकाश डांगे हा बहादूरवाडी येथे एका मोटारीतून नाैदल अधिकाऱ्याच्या वेशात आला. नितिनसोबत त्याचे मित्र संकेत माने, दीपक पाटील, रोहित दळवी, राजकुमार कोळी व राहुल गायकवाड हे सहा जण आकाशला भेटले. डांगे याने भरतीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानुसार, सहा जणांनी तीस लाख रुपये दिले. यानंतर, ऑक्टोबर, २०१९ मध्ये डांगेने सर्वांना नियुक्तिपत्र दिले व ओरिसा येथे मेडिकलसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. सर्व जण २१ मार्च, २०१९ रोजी आकाश सोबत रेल्वेने भुवनेश्वरला गेले. सर्वांना रेल्वे स्थानकावर थांबवून भरतीप्रक्रियेची माहिती घेण्याच्या बहाण्याने डांगे बाहेर गेला. काही वेळाने परत येत वादळामुळे ट्रेनिंग सेंटर विस्कळीत झाल्याने मेडिकल लांबणीवर पडले आहे, असे सांगितल्याने सर्व तेथून परत आले. यानंतर, आकाश डांगेने पुन्हा नवीन नियुक्तिपत्रे दिली व २२ मे, २०२० रोजी मेडिकलसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे भरतीच झाली नाही. यानंतर सर्व जण डांगेच्या पाडळी येथील गावी गेले. यावेळी त्याने तीस लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो वटलाच नाही. अखेर सर्वांनी आष्टा पोलिस ठाण्यात डांगेविरोधात गुन्हा दाखल केला.

कागदपत्रे जप्त आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. 

टॅग्स :Employeeकर्मचारीfraudधोकेबाजी