शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीवर प्रियकराचा जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार करून सुतळी बॉम्ब स्वतःच्या तोंडात फोडला अन्..  

By पूनम अपराज | Updated: November 19, 2020 16:52 IST

Crime News : ५८ वर्षीय प्रेयसीवर ५५ वर्षीय प्रियकराचा जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देही धक्कादायक घटना मुंबईत मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. कुरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे. 

मुंबईत एका ५५ वर्षीय प्रियकराने आपल्या ५८ प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. या घटनेत प्रेयसी आणि प्रियकर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना मुंबईत मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. 

प्रियकराने प्राणघातक हल्ला केल्यानंतर महिला जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने क्रूरपणे तिचे केस कापले. त्यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये एका इमारतीमधील एक ५८ वर्षीय घटस्फोटीत महिला तिच्या ८० वर्षीय आई, दोन मुली आणि एका मुलासोबत राहते. या महिलेचे ५५ वर्षीय वाहन चालक सचिन चौहान याच्याशी प्रेमसंबंध होते. जवळपास १५ वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने आरोपी सचिन चौहानचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.

१ नोव्हेंबरला सचिन चौहान प्रेयसीला भेटाण्यासाठी तिच्या घरी आला. परंतु प्रेयसीच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. यावरुन सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिच्या ८० वर्षीय आईचे भांडण झाले. नंतर १५ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही महिला कामावर जाण्यासाठी निघताच सचिन चौहानने घरात प्रवेश केला.  पुन्हा सचिनसोबत त्या महिलेचे कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके टोकाला पोचले की सचिनने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि अंगावर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता अमानुषपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले. नंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या विचित्र घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. कुरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी