शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Crime News: एकतर्फी प्रेमात आंधळा...! पिस्तुलच्या गोळ्यांवर तरुणीच्या कुटुंबाचे नाव लिहून तिच्या घरी गेला; पोलीसही ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:33 IST

पोलिसांनी सतीशला काय हवेय असे विचारले, त्यावर त्याने आपला खासगी विषय आहे, पोलिसांनी जावे असे सांगत गोळी मारण्याची धमकी दिली.

बिहारमध्ये एका एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणाने जे केले ते पाहून पोलिस अधिकारीदेखील हादरले आहेत. या घटनेत कोणाला साधी दुखापतही झाली नाही, परंतू या तरुणाने तरुणीच्या आई वडिलांसोबत त्यांना सोडविण्यासाठी चर्चेसाठी गेलेल्या पोलीस इन्स्पेक्टरलाही ओलीस ठेवले होते. 

बेतियातील महेंद्र कॉलनीमध्ये राहणाऱ्या अरूण  कुमार यांच्या घरात सतीश या तरुणाने सहा तास गोंधळ घातला होता. पिस्तुलच्या धाकावर त्याने कुमार यांच्या घरातील सहा लोकांना वेठीस धरले होते. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने पिस्तुलमधील गोळ्यांवर तरुणीच्या आई-वडिलांचे आणि स्वत:चे नाव लिहिले होते. 

या लोकांना वाचविण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही या तरुणाने ओलीस ठेवले. हा तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सकाळी सात वाजता घरात घुसला होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या तरुणाच्या तावडीतून घरातील लोकांना सोडविण्यास गेले होते. कसेबसे एक पोलीस इन्स्पेक्टर घरात पोहोचले परंतू त्यांनाही या तरुणाने बंदी बनविले. कसेबसे ते सतीशच्या तावडीतून सुटले आणि बाहेर पडले. इन्स्पेक्टरला बंदी बनविल्याचे समजताच वरिष्ठ अधिकारी तिथे आले होते. त्यांनी घराला वेढा घातला.

पोलिसांनी सतीशला काय हवेय असे विचारले, त्यावर त्याने आपला खासगी विषय आहे, पोलिसांनी जावे असे सांगत गोळी मारण्याची धमकी दिली. घरात आणखी एक पोलीस जवान अडकला होता. त्याने सतीशला इकडे तिकडे गुंतवण्यास सुरुवात केली. सतीशला चमचा घेण्यात गुंतवताच पोलिसांनी दरवाजा तोडला आणि सतीशवर हल्ला करत त्याला ताब्यात घेतले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सतीशकडून पिस्तूल आणि पाच काडतूस जप्त करण्यात आले. यावर त्याने स्व:ताचे आणि तरुणीच्या कुटुबीयांचे नाव लिहिले होते. सतीशला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.  

टॅग्स :Biharबिहार