शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

पनीरची भाजी खाल्ल्यानंतर प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी गंभीर; फूड पॉयझन की आणखी काही? पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 00:53 IST

वर्षभरापूर्वी होळीच्या दिवशी रितिक आणि त्याच्या भावासोबत एका तरुणाचे भांडण झाले होते. त्यावेळी त्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न रितिक आणि त्याच्या भावाने केला होता.

नागपूर - रात्री त्यांनी हॉटेलमधून पनीरची भाजी विकत घेतली. ती खाल्ल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. रात्री उशिरा त्यांना उलट्या सुरू झाल्याने घरच्यांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

रितिक खोब्रागडे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अजनीत राहतो. त्याची प्रेयसी अजनीतीलच दुसऱ्या भागात राहते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे सोबत फिरले. नंतर त्यांनी एका हॉटेलमधून पनीरची भाजी विकत घेतली. ती आणून खाल्ल्यानंतर दोघांनी एकमेकांना ‘बाय’ करीत आपापले घर गाठले. रात्री रितिकला उलट्या होऊ लागल्या. तोंडातून फेस येत असल्याने घरच्यांनी रितिकला रुग्णालयात दाखल केले. तिकडे तिच्याही बाबतीत असेच घडल्याने तिच्या घरच्यांनीही तिला मेडिकलमध्ये नेले. उपचार सुरू असताना रितिकचा मृत्यू झाला. शनिवारी अजनी पोलिसांना हा प्रकार माहीत पडला. त्यानंतर सायंकाळपासून उलटसुलट चर्चेला उधाण आले. ठाणेदार सारिन दुर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच रितिकच्या घरी तसेच त्या तरुणीच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. फूड पॉयझन झाले, असा संशय दोघांच्याही घरच्यांनी दिलेल्या माहितीतून व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालातून मात्र ते स्पष्ट झाले नाही.

... तर, इतरांना का नाही ?ज्या हॉटेलमधून या दोघांनी खाद्यपदार्थ घेतले, त्या हॉटेलमधून अनेक ग्राहकांनी त्याचवेळी तीच भाजी विकत नेली. काहींनी तेथेच जेवणही केले. मात्र, रितिक आणि त्याची मैत्रिण वगळता अन्य कुणालाही काही त्रास झाला नाही. त्यामुळे हा फूड पाॅयझनचा प्रकार आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वर्षभरापूर्वीची ‘ती’ घटना -वर्षभरापूर्वी होळीच्या दिवशी रितिक आणि त्याच्या भावासोबत एका तरुणाचे भांडण झाले होते. त्यावेळी त्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न रितिक आणि त्याच्या भावाने केला होता. त्या गुन्ह्याखाली अजनी पोलिसांनी रितिक आणि त्याच्या भावाला अटकही केली होती. आता बरोबर होळीच्याच वेळी ही घटना घडल्याने शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल