शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेच्या गळ्याला चाकू लावून केलेल्या लुटीमागे 'प्रियकर'; तीन तासांत बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 10:33 IST

Crime News: पोलिसांनी  फिर्यादीच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी  एका विशिष्ट क्रमांकावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते.

बारामती : बारामती शहरात रविवारी (दि 14) भर दिवसा फलटण रस्त्यावरील गॅरेज मालकाच्या घरात घुसून सासू सुनेच्या गळ्याला चाकू लावत लूट करण्यात आली होती. या घटनेत दागिने आणि साडे सहा लाखांच्या रोख रकमेसह आठ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा शोध घेतला आहे. या घटनेत फिर्यादी महिलेनेच बनाव रचत एका चायनीज गाडा चालविणाऱ्या युवकाच्या मदतीने हा प्रकार घडवून आणल्याचे उघड झाले आहे. (fake Robbery in Baramati exposed by police)

काल दुपारी हा प्रकार घडला. भर दिवसा घडलेला प्रकार असल्याने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी गांभीर्याने घेत तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांच्या तत्परतेने ही घटना आता उघड झाली आहे. पोलिस निरिक्षक शिंदे यांनी फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून तातडीने चोरट्यांचा तपास सुरु केला.प्राथमिक  चौकशीत पोलिसांना काही बाबी खटकल्या. या प्रकरणाच्या मुळाशी जात त्यांनी तपास सुरु केला. यात सत्य समोर आल्यानंतर मात्र पोलीस देखील आश्चर्यचकित झाले. फिर्यादी महिलेनेच पैशाची अडचण दूर करण्यासाठी रोकड व दागिने लुटीचा हा सगळा बनाव रचल्याचे समोर आले. यामध्ये चायनीज विक्री करणाऱ्या एका युवकाची मदत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांनी  फिर्यादीच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी  एका विशिष्ट क्रमांकावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर त्या नीरा वागज येथील तीस वर्षीय चायनीज गाडा चालविणाऱ्या लखन गोपाळ भोसले (वय 30,रा. निरा वागज, ता. बारामती) या  युवकापर्यंत पोलीस पोहचले. पोलिसी खाक्या दाखवताच माहिती समोर आली.  त्याच्याकडेच लूट केलेली रोख रक्कम व दागिने सापडले आहेत. खोटी फिर्याद देत रचलेल्या बनावामुळे पोलिसांची दमछाक झाली. संबंधित महिलेविरुध्द न्यायालयात ही बाब मांडणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. मदत घेतलेला माणूस फिर्यादीचा प्रियकर आहे. त्यातुन हा प्रकार झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :RobberyचोरीBaramatiबारामती