शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग! ब्रेकअपनंतर 60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; फेकलं अ‍ॅसिड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:47 IST

एक 60 वर्षीय व्यक्ती आणि 48 वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच ब्रेकअप झालं.

नवी दिल्ली - प्रेमाला वयाचं बंधन नसतं. कधीही कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. पण अनेकदा या प्रेमातूनच सूड, बदला अशा गोष्टी समोर येतात. कधी कधी अत्यंत भयंकर प्रकार घ़डल्याचं देखील आपण पाहतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या बेतियामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली. एका 60 वर्षीय प्रियकराने 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला केला आहे. प्रेमात दुरावा आल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बेतियामध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती आणि 48 वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच ब्रेकअप झालं. मुलांवरून वाद झाल्याचं समोर आलं आहे. प्रेमसंबंध तुटल्याच्या रागात संतापलेल्या 60 वर्षीय प्रियकराने आपल्या 48 वर्षीय प्रेयसीवर थेट अ‍ॅसिड फेकले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अ‍ॅसिड हल्ल्यात ही 48 वर्षीय प्रेयसी गंभीररित्या भाजली आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, मुलांवरुन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. या पुरुषावर आपले प्रेम नाही असं पीडित महिलेने कॅमेऱ्यासमोर सांगितलं आहे. पण दोघांच्या प्रेमसंबंधाची गावात चर्चा सुरू आहे.

प्रियकराने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेक वर्षांपासून आमच्यात चांगले संबंध होते. पण मुलांमुळे सर्व बिघडलं. पण एकाच गावात असल्याने आम्ही बऱ्याचवेळा एकमेकांसमोर येतो.  मी अ‍ॅसिड फेकलंच नाही असं प्रियकराने पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मला मुद्दाम यामध्ये अडकवलं असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी