शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

लव्ह, सेक्स और धोका... लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 19:53 IST

दोन महिन्यांनी पुरलेले प्रेत पोलिसांनी काढले बाहेर 

ठळक मुद्देमानखुर्द पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना अटक करून काल रायगड जिल्यातील माणगांव येथील शिरसाड गावात पुरलेला रोहिणीच्या मृतदेह बाहेर काढला. दोन महिन्यांनी मानखुर्द पोलिसंनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळून हत्येचा गुन्हा उघड केला आहे.    

मुंबई - मानखुर्द येथे राहणाऱ्या रोहिणी घोरपडे (२८) या महिलेच्या हत्येचं गूढ तब्ब्ल दोन महिन्यांनी उलगडलं आहे. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जाते  सांगून गेलेली रोहिणी घरी पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना अटक करून काल रायगड जिल्यातील माणगांव येथील शिरसाड गावात पुरलेला रोहिणीच्या मृतदेह बाहेर काढला. मृतदेह माणगांव येथील ग्रामीण रुग्णालयातून जे जे रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

दोन दिवसांनी रोहिणीच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात रोहिणीचे नवी मुंबई येथील नोकरीच्या ठिकाणी सुनील शिर्के नावाच्या इसमाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी मोठया चतुराईने रोहिणीच्या एसबीआय बँक खात्याची माहिती घेतली. दरम्यान तिच्या एटीएममधून १६ नोव्हेंबरला कोपरखैराणे येथील एटीएममधून ६५ हजार रुपये काढल्याचे अधिक तपासात समोर आलं आणि तेथेच पोलिसांना या गुन्ह्याचा धागादोरा सापडला. पैसे काढणारा इसम हा रोहिणीच्या प्रियकराचा मित्र राम जाधव होता.

राम आणि सुनील हे दोघे रोहिणीच्या काटा काढण्यासाठी सतत संपर्कात होते. महत्वाचे म्हणजे रायगड जिल्ह्यतील माणगाव येथील शिरसाड येथे सुनीलने रोहिणीच्या काटा काढण्याआधीच खड्डा खोदून ठेवला होता. पोलिसांनी रामचा माग काढत त्याला ताब्यात घेतले आणि नंतर रोहिणीच्या खुनाचे गूढ उलगडत गेले. १४ नोव्हेंबरला कारने सुनील आणि रामने रोहिणीला माणगावला नेले. कार चालक  विजयसिंह मोरे हा देखील सुनीलचा मित्र. राम आणि विजयसिंहच्या मदतीने सतत लग्नसाठी आग्रह धरत असलेल्या रोहिणीचा नियोजनपूर्वक काटा काढला. लग्नाचा तगादा लागल्याने रोहिणी आणि सुनील यांच्यात सतत वाद होत. शेवटी तिघांनी मिळून माणगाव येथील शिरसाड गावात नेवून रोहिणीच्या डोक्यात लाकडी फावड्याने जोरदार प्रहार करून तिला ठार केले. आणि दोन दिवस अगोदर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. पोलिसांनी राम, सुनील आणि विजयसिंहला ६ फेब्रुवारीला अटक केली असून दोन महिन्यानंतर पुरलेले रोहिणीचे प्रेत बाहेर  शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन महिन्यांनी मानखुर्द पोलिसंनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळून हत्येचा गुन्हा उघड केला आहे.    

टॅग्स :MurderखूनRaigadरायगडPoliceपोलिसArrestअटक