शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवेड्या अभियंत्याने मंत्रालयात मारली उडी, प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने झाला मनोरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 07:40 IST

Mumbai: डिप्लोमा करून इंजिनिअर बनला, नंतर प्राध्यापक झाला, मग दूध डेअरीचा चेअरमन झाला. यातच तो तरूण एका मुलीच्या प्रेमात पडला. मात्र, तिने आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने हा मनोरुग्ण झाला.

मुंबई/आष्टी (जि. बीड) : डिप्लोमा करून इंजिनिअर बनला, नंतर प्राध्यापक झाला, मग दूध डेअरीचा चेअरमन झाला. यातच तो तरूण एका मुलीच्या प्रेमात पडला. मात्र, तिने आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने हा मनोरुग्ण झाला. तेव्हापासून तो आपल्या प्रेयसीवर अत्याचार झाला असून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करत भटकत आहे. गुरूवारी याच तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.   आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील बापू नारायण मोकाशे (४४) असे या तरुणाचे नाव आहे. मुंजाबा वस्तीवर बापू हा एकटा राहतो. बारावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा केला. पुण्यात अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून टाकळी ढाेकेश्वर आणि जामखेड येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. दूध डेअरीचा चेअरमनही झाला. याच दरम्यान त्याचा एका मुलीवर जीव जडला. दोघेही नगरमध्ये राहत होते. परंतु, त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली. त्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. प्रेयसीवर अत्याचार झाला, आरोपींना अटक करा अशी मागणी तो करत असतो. परंतु गावातील लाेकांना सर्व कहाणी माहिती असल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.   

माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली पण... बापूने उडी मारली पण सुरक्षा जाळीमुळे तो बचावला. त्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. माझ्या प्रेयसीवर बलात्कार झाला. तिने आत्महत्या केली. याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली. मात्र, कोणीही दखल घेतली नाही, असे त्याचे म्हणणे आहे.    चार दिवसांपासून गायबबापू मागील चार दिवसांपासून गायब असल्याचे त्याच्या गावकऱ्यांनी सांगितले. कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याने काहीच सांगितले नव्हते. तो गावात एकटा फिरायचा, एकटाच बसायचा, प्रेमभंग झाल्याचे बोलून दाखवायचा. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMumbaiमुंबई