शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रिल्स बनवताना तरुणांचे हरपले भान; जैन मुनींना दुचाकीची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 05:25 IST

सौम्यसागरजी महाराजांसह एक भाविक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (जि. परभणी) :  जैन मुनीश्री सौम्यसागरजी महाराज हे अन्य ५ जैन मुनीश्रींसोबत पायी चालत बोरीवरून चांदजकडे येत असताना  दोन दुचाकींवर बसून ४ तरुण रिल्स (व्हिडीओ) बनवत भरधाव वेगाने आले. त्यांनी मुनीश्री सौम्यसागरजी महाराज व त्यांच्या सोबतच्या जिंतूर येथील सेवेकरी संकेत मोहारे यांना जोराची धडक दिली. यात महाराजांसह भाविक जबर जखमी झाले आहेत. ही घटना बोरी तांड्याजवळ रविवारी सायंकाळी घडली.

अपघातानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही होणाऱ्या वेदना सहन करत मुनीश्री घटनास्थळी बसले होते. घटनेची माहिती मिळताच डॉ. विशाल परिहार, सचिन राठोड यांच्यासह  जैन साधकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात मुनीश्री सौम्यसागरजी महाराज यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. जिंतूर शहरात मुनीश्रींवर उपचार सुरू आहेत.

वाहनात बसण्यास नकार अपघातानंतर मुनीश्रींना उपचारासाठी वाहनातून रुग्णालयात चलण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला. याबाबत त्यांच्या गुरूंना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरू आदेशाने ते स्ट्रेचरवर बसले. भाविकांनी स्ट्रेचर ढकलत जिंतूरपर्यंत आणले.

मुनीश्री महाराजांवर आयुर्वेदिक उपचारमुनींश्री सौम्यसागरजी महाराज यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू असून मुंबई येथील डॉ. सुभाष शहा हे मुनींश्रीवर उपचार करीत आहेत. सध्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी महाराजांचे वास्तव्य असून महाराजांच्या सेवेसाठी परमपूज्य मुनींश्री वीरसागरजी महाराज हिंगोली येथून ९ मुनीश्रींसह जिंतूर शहरात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात