शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात व्यापाऱ्याला लुटले; यावलच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याला फोन पेने पैसे आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 23:09 IST

एकास घेतले ताब्यात : शासकीय कर्मचारी तरुणीही अडचणीत. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते.

यावल : कर्नाटक राज्यातील लूटप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी येथील एका शासकीय कर्मचाऱ्याच्या मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या घरात आश्रयास असलेला एक जण फरार झाला आहे, तर शासकीय कर्मचारी तरुणी मोबाईलमुळे अडचणीत आली आहे. या तरुणीस कर्नाटक पोलिसांनी चौकशी साठी  हजर राहण्याची समज दिली आहे.  या कारवाईने कर्नाटकातील लूट प्रकरणाचे धागेदोरे यावलपर्यंत पोहोचल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते. या प्रकरणी तीन संशयितांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात अटक केली होती. त्यातील दोन संशयित आरोपी हे यावल शहरात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती.  हा संशयित आरोपी एका तरुणीच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले होते.  गुरुवारी पहाटे कर्नाटक पोलीस पथक यावलला आले व पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, कॉ.  सुशील घुगे, राजेश वाढे, भूषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर यांनी संबंधित तरूणीचा शोध घेतला. तेव्हा ती तरूणी वाघझिरा आश्रमशाळेत कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

विचारपूससाठी या तरुणीशी संपर्क केला असता ती  यावल येथील बसस्थानकावर असल्याचे तिने सांगितले.  तिच्यासोबत आदित्य सत्यवान पवार हा तरूणदेखील होता. कर्नाटक पोलिसांना हाच तरुण हवा होता. तेव्हा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्ह्यातील एक संशयित शिवकुमार हा पवार यांच्या घरी आश्रयास होता. त्यास ताब्यात घेण्याकरीता पोलीस पथक शहरातील हरिओम नगरात गेले असता पोलिसांचे वाहने पाहून शिवकुमार तेथून फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत असून, आदित्य पवार यास कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर तरुणीस  शांतापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. 

तरुणीच्या मोबाईलवर टाकले पैसेआदित्य पवार हा येथील प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पवार हे  मूळचे सोलापूरचे आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य पवार याने  वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीचा  मोबाईल गुन्ह्यात वापरला आहे. तिच्या फोन पेवर ५० हजारांची रक्कम देखील टाकली आहे. त्यामुळे ही तरुणी अडचणीत आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक