लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वैशाली शेंडे (३५) रा. पारडी, रेणुकानगर असे फिर्यादी युवतीचे नाव आहे. वैशालीने मॅट्रमोनी साईटवर लग्नासाठी आपली माहिती नोंदवली होती. या साईटचा हवाला देत ८ जुलै २०१९ रोजी जुळे राजकुमार नावाच्या युवकाने त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल केला. जुळे राजकुमारने तो लंडनला राहत असल्याचे सांगत वैशालीसोबत मैत्री केली. यानंतर वैशालीसाठी लंडनवरून शूज, गोल्ड आणि डायमंड गिफ्टसह विदेशी करन्सी पाठविल्याचे आमिष दाखविले. यानंतर काही दिवसांनी एका महिलेने स्वत:ला दिल्ली कस्टम विभागातील अधिकारी असल्याचे सांगत वैशालीला तिचे गिफ्ट आल्याचे सांगितले. परंतु हे महागडे गिफ्ट कस्टममधून क्लिअर करण्यासाठी विविध चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा करायला लावली. ही रक्कम जमा केल्यानंतरही वैशालीला कुठलेही गिफ्ट मिळाले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैशालीने पारडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पारडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.व्हीओआयपी नंबरचा वापरआरोपीने वैशालीला फोन करण्यासाठी व्हाईस ओव्हर इंटरनेट कॉल (व्हीओआयपी) तंत्रज्ञानाचा वापर केला. याला इंटरनेट कॉलसुद्धा म्हटले जाते. सायबर गुन्हेगार या तंत्रज्ञानाचा वापर करताहेत. यात आरोपीचा पत्ता लावणे कठीण असते. आरोपी इंटरनेटवर स्वत:ची बोगस आयडी टाकून नंबर प्राप्त करतात आणि त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात.पीडित परिवार पोलीस विभागाशी संबंधितवैशालीचे वडील शहर पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या रकमेतूनच वैशालीने आरोपीला रक्कम दिली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर वैशालीवरच आई व घराची जबाबदारी आहे. फसवणुकीनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
लंडनच्या मित्राने नागपूरच्या तरुणीला फसवले : १६.३१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:41 IST
पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लंडनच्या मित्राने नागपूरच्या तरुणीला फसवले : १६.३१ लाखांचा गंडा
ठळक मुद्देडायमंड व विदेशी करन्सी पाठवण्याचे आमिष