लोणावळा : लोणावळा येथील औंढे गावाच्या हद्दीमधील खाडे वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या एका गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे 45 बॅरल जप्त करून ती दारू नष्ट केली. सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा हा मुद्देमाल होता. औंढे गावाच्या हद्दीत अक्षय राजपूत नावाची व्यक्ती गावठी हातभट्टी लावून दारू बनवत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीणच्या पोलीस पथकाने आज अचानक छापा टाकत गावठी हातभट्टीच्या दारुचे 45 भरलेले बॅरल (4500 लिटर) गावठी हातभट्टीचा साठा नष्ट केला. तसेच सदर 45 बॅरल व 100 किलो जाळायची लाकडे हा साठा देखील नष्ट केला. लोणावळा ग्रामीण भागात झालेली ही मोठी कारवाई आहे.
गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 1 लाख 33 हजारांची दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 22:03 IST