शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट: दीडशे कोटींच्या 'काक' घोटाळ्याची चौकशी  ईओडब्ल्यू करणार

By गजानन जानभोर | Updated: February 23, 2022 13:02 IST

सहपोलीस आयुक्तांकडून दुजोरा, दोन लाखाहून अधिक लोकांची फसवणूक

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: बोरिवलीतील काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक किशोर काकडे याने ऐन लॉकडाऊनमध्ये विविध योजनांच्या नावाखाली शहरांसह गावखेड्यातील गरिबांकडून पैसे उकळले. आता हा फसवणुकीचा आकडा हा दीडशे कोटींच्या घरात गेला आहे. सदर प्रकरण सर्वप्रथम 'लोकमत' ने उघडकीस आणले. ज्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. 

बोरिवली पोलिसांनी काकडेच्या काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात जेव्हा धाड टाकली तेव्हा तेथील संगणक, सर्व्हर तसेच क्लाउड सर्व्हरवरील सर्व डेटा जप्त करण्यात आला. ही माहिती खंगाळत असताना गुंतवणूकदारांच्या यादीत २ लाखांहून अधिक लोकांची नावे उघड होऊन आकडा १५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या फसवणूकीची बातमी 'लोकमत' ने 'गरिबांची अशीही फसवणूक, पाच हजारात वर्षभर किराणा' या मथळ्याखाली २० फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रकाशित केली. त्यानुसार सोमवारी याप्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून घेत तपास आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्याचा निर्णय घेतला. 

मंगळवारी बोरिवली पोलिसांनी तपासाची संबंधित कागदपत्रे ईओडब्ल्यूकडे सोपवली. याप्रकरणी ईओडब्ल्यूचे सह पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना लोकमत प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गरीब, रोजंदारीवर असलेल्या मजूरांनी कंपनीत दोन वेळेचा किराणा मिळण्याच्या आशेने ही गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्याची सखोल चौकशी झाल्यास फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यानी वर्तवली आहे.

'सिक्रेट रेड' आणि सापडले पुरावे !आरोपी काकडे हा राजकीय पोच असलेला व्यक्ती असल्याने बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अत्यंत गुप्त पद्धतीने 'काक' कार्यालयात धाड टाकली. अन्यथा पुरावा असलेला डेटा डिलीट करून तो फरार होण्याची शक्यता होती. त्याच्या उपस्थितितच फसव्या कंपनीचे सर्व रेकॉर्ड जप्त करत त्याच्या मुसक्या अवळण्यात आल्या.

आरोपीशी 'सेटलमेंट' आणि...गेल्या दोन वर्षात बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या लोकांचा उद्देश काकडेशी सेटलमेंट करण्याचा होता. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास कोणीच पुढे आले नाही आणि परिणामी घोटाळ्याचा हा वणवा पसरतच गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.