शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 22:32 IST

बुधवारी घडलेल्या घटनेत तब्बल 2 लाख 26 हजारांचे दागीने लुबाडण्यात आले.

ठळक मुद्दे शांती नगर सेक्टर 6 मधील सी - 18 मध्ये राहणाऱ्या पुष्पाबेन शहा (70) या बुधवारी पावणे सहाच्या सुमारास जैन मंदिरात पुजेसाठी गेल्या. त्या आधी क्विन्स पार्कमधील साई पार्कमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सालियन या 60 वर्षाच्या वृध्द महिलेस देखील पोलीस असल्याचे सांगून लुबाडण्यात आले.

मीरारोड - कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर केली असता गुन्ह्यांचे प्रमाण देखील खुपच कमी झाले होते. मात्र, लॉकडाऊन शिथील होऊन लोकांची वर्दळ वाढु लागताच आता चोरटे देखील सरसावले आहेत. मीरारोडमध्ये पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्दांचे दागिने लुबाडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. बुधवारी घडलेल्या घटनेत तब्बल 2 लाख 26 हजारांचे दागीने लुबाडण्यात आले.शांती नगर सेक्टर 6 मधील सी - 18 मध्ये राहणाऱ्या पुष्पाबेन शहा (70) या बुधवारी पावणे सहाच्या सुमारास जैन मंदिरात पुजेसाठी गेल्या. पूजा करुन घरी परत येत असताना तोंडावर मास्क घातलेला इसम आला व पोलीसवाला बोलावतो असे सांगितले. त्यामागे उभ्या असलेल्या इसमाकडे गेल्या असता त्याने, आपण पोलीस असून रात्री येथे एका महिलेला चाकू मारुन गळ्यातले दागिने नेल्याचे आणि तुम्ही दागिने  काढुन बॅगेत ठेवा सांगितले. 

पुष्पाबेन यांनी सोन्याच्या बांडय़ा, दोन सोन्याच्या चैन, दोन सोन्याच्या अंगठय़ा असे 2 लाख 26 हजार रुपयांचे दागिने काढले व दुसऱ्या इसमाकडे कागदात ठेवण्यास दिले. ते कागदात ठेवल्याचे सांगून पुडी पुष्पाबेन यांच्या बॅगेत ठेवली. घराजवळ पोहचल्या असता मुलगा हितेश भेटला व त्यास पोलीसवाला भेटल्याचे सांगितले. कागदाची पुडी उघडुन पाहिली असता त्यात दागिने नव्हते. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या आधी क्विन्स पार्कमधील साई पार्कमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सालियन या 60 वर्षाच्या वृध्द महिलेस देखील पोलीस असल्याचे सांगून लुबाडण्यात आले. सकाळी साडे सातच्या सुमारास त्या मुख्य रस्त्यावर चालत जात असताना एकाने पोलीस असल्याचे सांगून पुढे एका महिलेचा खून करुन तिचे दागिने काढून नेल्याचे सांगितले. लक्ष्मी यांनी त्यांच्या हातातील बांगड्या व गळ्यातील चैन असे 1 लाख 87 हजार रुपयांचे दागिने काढुन दिले. ते बॅगेत ठेवतो सांगून हातचलाखीने लुबाडुन नेले. याचा गुन्हा देखील नया नगर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

 

अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असून धार्मिक स्थळे बंद आहेत. तसेच नाहक बाहेर पडु नये म्हणुन लोकांना आवाहन केले गेले आहे. त्यातच या पुर्वी देखील चेनस्नॅचिंग, पोलीस असल्याचे वा अन्य कारण सांगुन दागिने लुबाडण्याचे प्रकार घडले असल्याने पोलिसांकडून नेहमीच खबरदारी बाळगा, शक्यतो दागिने घालणे टाळा असे नेहमीच सांगितले जाते. तरीदेखील लोकं खबरदारी घेत नसल्याने गुन्हेगारांचे फावत असल्याचे जागरुक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसmira roadमीरा रोड