शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

लॉकडाऊन नावालाच; बारमध्ये मध्यरात्रीपर्यंत झिंगाट; छतावरही रंगतात पार्ट्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 00:43 IST

रात्री दहानंतर होतेय मद्यविक्री, ३० जानेवारीपर्यंतच्या असलेल्या लॉकडाऊनचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये मद्यपानाला अप्रत्यक्षपणे पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन असल्याने रात्री ठरलेल्या वेळेत आस्थापने बंद करणे आवश्यक आहे. यानंतरही बार व मद्यविक्री केंद्रांना नियमातून सूट दिली जात आहे.

३० जानेवारीपर्यंतच्या असलेल्या लॉकडाऊनचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. रात्री ठरवून दिलेल्या वेळेत विविध आस्थापने बंद करणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबईसह पनवेल व परिसरात बार व मद्यविक्री केंद्रांना मात्र त्यातून वगळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्री १२ नंतर अनेक बार सुरू ठेवले जात असून, त्यापैकी काही बारच्या छतावर मद्यपानाला मुभा दिली जात आहे, तर पनवेल परिसरात चायनीज व ढाबा संस्कृर्ती मोकाट असून, त्याठिकाणी उघड्यावर मद्यपान होत आहे. परिणामी लॉकडाऊनमध्ये नियंत्रणात आलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. अशाच प्रकारातून गत महिन्यात कामोठे येथे ढाब्यावर गोळीबाराची घटना घडली, तर नेरुळ येथे बारच्या छतावर पार्टीत हाणामारीची घटना घडली; परंतु उघडपणे बार, मद्यविक्रीच्या ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. 

मद्यविक्री केंद्रांबाहेर गर्दीमद्यविक्री केंद्रांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत गर्दी होत आहे. त्यांच्याकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. वाहतुकीला अडथळा होऊन यामुळे अपघात घडत आहेत.

उघड्यावरच मद्यपानशहरातील बहुतांश मद्यविक्री केंद्रांच्या आवारात उघड्यावर मद्यपान केले जात आहे. त्यापैकी बहुतांश ठिकाणे मुख्य रस्त्यालगतची असतानाही होत नसलेल्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

बार ठरतात डोकेदुखीनवी मुंबईसह पनवेलमध्ये अनेक ठिकाणी मद्यरात्रीपर्यंत बार सुरू राहत आहेत. यामुळे त्याठिकाणी ये-जा करणाऱ्या तळीराम व गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस