शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लॉकडाऊनमुळे ओढवली बेरोजगारी, पोटाची भूक भागवण्यासाठी तरुणाने लोकलमध्ये केली 120 रुपयांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:09 IST

Crime News: धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 - आशिष राणे

वसई -  वसई रोड ते नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित रेल्वे प्रवाशी राजू बिर्जे यांच्या फिर्यादीवरून वसई रोड रेल्वे लोहमार्ग पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे तपास करून आरोपी अरबाज खान वय (18) याला अटक केली आहे. (Lockdown leads to unemployment, youth steals Rs 120 from local to satisfy hunger)

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 4 जुलै रोजी नालासोपारा ते वसई रोड रेल्वे स्थानक दरम्यान फिर्यादी राजू बिर्जे हे प्रवाशी रात्री 9.15 च्या सुमारास लोकलने प्रवास करताना धावत्या लोकल मध्ये आरोपी चढून राजू यांच्या गळ्याला ब्लेड लावुन धमकावले आणि त्याच्याकडून 120 रुपये चोरून वसई रोड रेल्वे स्थानकात ट्रेन येताच आरोपीने उडी मारून पळ काढला. दरम्यान घडल्या प्रकाराची फिर्याद पीडित प्रवाशी राजू बिर्जे यांनी वसई रोड लोहमार्ग पोलिसांना दिली असता रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध भा.दंड संहिता कलम  392 अनव्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.

या तपासात पोलिसांनीं नालासोपारा व वसई रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि अखेर  खबऱ्याच्या माहीतीवरून आरोपीला जेरबंद केलंरेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतल्यावर त्याची पीडित प्रवाशाकडून ओळ्ख पटवून घेतली तसेच त्या आरोपीची कुठलीही यापूर्वीची गुन्ह्यांची पार्श्वभूमी नसल्याचे ही तपासात निष्पन्न झाले.

परिणामी या जबरी चोरीच्या गुन्ह्यांविषयी आरोपी याला विचारले असता आपण आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली रेल्वे पोलिसांना दिली आहे, मात्र वसईत लोकल ट्रेन मध्ये घडलेल्या प्रकाराने एकार्थाने लॉकडाऊन काळातील बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल जातेय की काय असा गंभीर  प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या