शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे गँस सिलेंडर चोरणारे चोरटे गजाआड a

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:46 IST

फुरसुंगी येथील गँस गोडावून येथून गँस सिलेंडरची चोरीला गेल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्देहडपसर पोलिसांची कारवाई :  29 सिलेंडर व 2 टेम्पो केले जप्त.

पुणे : फुरसुंगी येथील गँस गोडावून येथून गँस सिलेंडरची चोरी करणा-या दोन चोरटयांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 29 सिलेंडर व 2 टेम्पो असा 3 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जयसिंग उर्फ गोरख विलास सावंत (वय 38, रा.भेकराईनगर, जुना फुरसुंगी रस्ता, हरपळे वस्ती) सियाराम काशि चौहान (वय 26, रा. भारत गोडावून समोर फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 21 एप्रिल रोजी फुरसुंगी येथील समर्थ भारत गँस खुटवड गोडावून च्या पाठीमागे 25 गँस सिलेंडर व एक पँगो रिक्षा चोरीला गेल्याचा गुन्हा हडपसरच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. भेकराईनगर व ढमाळवाडी या भागात एक हिरव्या रंगाचा टेम्पो फिरत असल्याची माहिती  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व पोलीस नाईक अनिल कुसाळकर यांना खब-याने  दिली.  त्यानंतर त्यांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची क बुली दिली. यात आरोपी सियाराम चौहान हा बिहार राज्यातला असून तो गोडावून मध्ये लोडींग अनलोडींगचे काम वर्षभरापासून करत होता. त्यामुळे त्याला गोडावूनची पूर्ण माहिती होती. तसेच जयसिंग उर्फ गोरख विलास सावंत हा पंधरा नंबर येथील साहिल एच पी गँस एजन्सीमध्ये मागील दहा वर्षांपासून गँस डिलेव्हरीचे काम करीत होता. गोरख सावंत याची स्वत:ची पँगो गाडी असून त्यावर एचपी गँसचा लोगो आहे. दोन्ही आरोपींचा मागील दोन महिन्यापूर्वी एका कामानिमित्त ओळख झाली होती. त्यांनी सर्व माहिती काढून त्यानुसार गँस सिलेंडर चोरण्याचा प्लँन बनविला. त्यानुसार त्यांनी 21 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता गोडावून मध्ये कोणीच नसताना दोन्ही आरोपींनी सिलेंडरची भरलेली गाडी त्याठिकाणाहून चोरी केली. त्यानंतर सावंत याने चोरीच्या गाडीतील सिलेंडर आपल्या गाडीत भरले. व चोरीची गाडी एका ठिकाणी लपवून ठेवली. दोन दिवसानंतर सावंत याने कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वत:च्या गाडीत गँस सिलेंडर भरुन एचपी गँस एजन्सीचा डेÑस परिधान केला आणि हडपसर भागातील हॉटेल चालक  व  नागरिकांना एक्स्ट्रा सिलेंडर कमी किंमतीत विकले. यावेळी ते पकडले गेले. त्यांच्याकडून दोन टेम्पो व एकूण 29 सिलेंड्र असा 3 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पुणे शहर परिमंडळ 5 चे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड, यांच्या सुचनेनुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसCylinderगॅस सिलेंडर