पिंपरी : तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणला. रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हारल केले. चिखली येथे २०१३ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी चेन्नई येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार टी अश्विन (रा. चेन्नई, तामिळनाडू) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विन याने पीडित तरुणाीला २०१३ ते २४ नोव्हेंबर २०१४ यादरम्यान लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यास भाग पाडले. यादरम्यान मोबाईलमध्ये तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढून ते व्हारल करण्याची धमकी दिली. तसेच फोटो वेबसाईटवर व्हारल करुन पीडित तरुणीची बदनामी करुन तिचा विनयभंग केला. यावरुन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसाजी काळे करत आहेत.
लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून केले अश्लिल फोटो व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:59 IST
तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणला.....
लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून केले अश्लिल फोटो व्हायरल
ठळक मुद्देयाप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल