शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'लि्व्ह इन' पार्टनर निघाला 'दो बच्चो का बाप!', पतीपासून विभक्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:16 IST

पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्या पिडित महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक (३४, रा. असदपुर ता. अचलपुर) याच्याविरूध्द २८ जानेवारी रोजी दुपारी बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

अमरावती : लिव्ह इन पार्टनर दोन मुलांचा बाप निघाल्याचे बिंग फुटल्याने महिलेने त्याला जाब विचारला. त्यातून त्याने पुढे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्या पिडित महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक (३४, रा. असदपुर ता. अचलपुर) याच्याविरूध्द २८ जानेवारी रोजी दुपारी बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी ही ३३ वर्षे वयाची असून ती परतवाडा येथील रहिवासी आहे. सन २००६ मध्ये राजकोट, गुजरात येथील एका व्यक्तीशी तिचे लग्न झाले होते. तिला त्याच्यापासून नऊ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, पतीसोबत पटत नसल्याने ती नऊ वर्षांपासून पतीपासून विभक्त राहते. दोन वर्षांपुर्वी त्यांचा घटस्फोट देखील झाला आहे. दरम्यान परतवाडा येथे राहत असताना तिचा आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक याच्याशी ओळख झाली. सुमारे पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध बहरल्याने ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये पतीपत्नीसारखे राहू लागले. मात्र तब्बल चार ते पाच वर्षांनंतर तो विवाहित असल्याचे त्याने तिच्यापासून दडवून ठेवले.

मुलासह तिचा जीव घेण्याची धमकीदरम्यान, सारे काही निट सुरू असताना आरोपी शेख अस्मतचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असल्याचे फिर्यादी महिलेला २७ जानेवारी रोजी दुपारी समजले. ते ऐकून तिच्या पायाखालची वाळू सरकली. त्याबाबत तिने आरोपीला जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन आरोपी शेख अस्मत याने तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. विरोध केला असता तुझा व तुझ्या मुलाचा जिव घेईन अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर तिने धाडस करत शनिवारी दुपारी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले.

पिडिताच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्ह्याची नोंद केली. आरोपीच्या शोधासाठी एक पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.- संदीप चव्हान, ठाणेदार, परतवाडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी