शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
3
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
4
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
5
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
6
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
8
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
9
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
10
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
11
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
12
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
13
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
14
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
15
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
16
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
17
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
18
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

काकाला वाचवा! दारुबंदी कायद्यात पुतण्याला अडकवायचे होते; पोलखोल झाली, बडा अधिकारीच अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 12:45 IST

Crime news Bihar: काका-पुतण्यामध्ये जुना कौटुंबिक वाद सुरु आहे. पुतण्याला अडचणीत आणण्यासाठी काकाने अनेकदा आपली ताकद वापरली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही.

बिहारमध्ये दारुबंदीवर कठोर कायदा आहे. तरीही लोक सोडा विधानसभेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी दारु पित असल्याचे फोटो गेल्या महिन्यात समोर आले होते. विधानसभा आवारात दारुच्या बाटल्यांचा खच सापडला होता. याच दारुमुळे बिहार सरकारचा एक बडा अधिकारी पुरता अडकला आहे. पुतण्यासाठी जाळे रचले होते, त्यात तो स्वत:च अडकला आहे. 

पुतण्या एक औषधांचा व्यापारी आहे. तर गिरेंद्र मोहन हा बिहार सरकारच्या कृषी विभागात मोठा अधिकारी आहे. काका-पुतण्यामध्ये जुना कौटुंबिक वाद सुरु आहे. पुतण्याला अडचणीत आणण्यासाठी काकाने अनेकदा आपली ताकद वापरली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात खोटे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी ते सिद्ध करत पुतण्याला संरक्षण दिले. एकसोएक प्रकार करूनही पुतण्या बधत नाही हे पाहून या अधिकाऱ्याने त्याला दारुबंदी कायद्यात अडकविण्याचा प्लॅन आखला. 

दोघांचेही मूळ घर एकच होते. एके दिवशी या अधिकाऱ्याने आपल्या घरात दारुच्या बाटल्या आणून ठेवल्या आणि पोलिसांना फोन करून पुतण्या दारुची तस्करी करत असल्याची टिप दिली. पोलीस आणि महसूल विभागाचे पथक तिथे पोहोचले, रात्रीच छापा मारण्यात आला. तेव्हा घरातून देशी दारुच्या कॅनसह विदेशी दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या. मात्र, दारुच्या तस्करीचे हातखंडे माहिती असलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला काहीतरी खटकले. त्याने तपास सुरु केला तेव्हा त्याला खळबळजनक पुरावा सापडला.

छापा पडला तेव्हा काका तिथेच उभा होता. अधिकाऱ्यांनी ज्या फोनवरून फोन आला होता त्यावर फोन  लावला, तेव्हा काकाचा फोन वाजला. काकाचा फोन ताब्यात घेतला तेव्हा दुधवाल्याशी झालेले संभाषण हाती लागले आणि सारी पोलखोलच झाली. काकाने दुधवाल्याकडून दारुची व्यवस्था केली होती. त्यानंतर त्याने या बॉटल आणि कॅन घरात लपविले होते. दुधवाल्याने पोलिसांचा हिसका मिळताच भडाभडा सत्य सांगितले. आता काकाच या दारुबंदी कायद्यात अडकला आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहार