शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:57 IST

लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने आयुष्य संपविल्याचे रविवारी बोरीवलीत उघडकीस आले. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निशांक शर्माविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने आयुष्य संपविल्याचे रविवारी बोरीवलीत उघडकीस आले. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निशांक शर्माविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.गोराईत ५५ वर्षीय तक्रारदार हे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतात. १० नोव्हेंबर, २०१३ रोजी मुलगी नेहा (नावात बदल) हिने आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र, त्यांच्यात न पटल्याने २०१५ मध्ये घटस्फोट घेण्याचे ठरविले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नेहाही माहेरी राहण्यास आली.तेथे तिने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान तिची निशांक शर्मासोबत ओळख झाली. तो मीरा रोड येथे राहतो. तो तिला आॅर्डर मिळवून देत होता. सर्व सुरळीत सुरू असताना, १५ जूनला ३१ वर्षीय नेहाने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतला. बोरीवली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.त्यानंतर, काही दिवसांनी लहान मुलीने नेहाबाबत वडिलांना माहिती दिली. निशांक आणि नेहा गेल्या एक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. नेहाचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही लग्न करणार होते. रविवारी त्यांनी नेहाचा मोबाइल क्रमांक तपासला, तेव्हा आत्महत्येच्या आदल्या दिवशीच शशांकने नेहाच्या चारित्र्यावर संशय घेत, तिला अश्लील शिव्यांचे संदेश पाठविल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून नेहाने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होताच, वडिलांनी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बोरीवली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबई