शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा केला पर्दाफाश; नाशिकजवळ घडला प्रकार

By अझहर शेख | Updated: September 5, 2022 21:23 IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ वनाधिकाऱ्याकडून हवेत गोळीबार

नाशिक: बिबट्याच्या कातडीच्या तस्करीच्या बेतात असलेल्या संशयितांची गोपनीय माहिती काढून वनविभागाच्या इगतपुरी पथकाने सापळा रचला. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जव्हार-मोखाडा रस्त्यावरील आंबोली फाट्यावर सोमवारी (दि.५) दुपारी चार वाजेच्या सुमारास तस्करीचा डाव वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल उधळला. यावेळी तस्करांनी दगडांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. हल्ला थोपविण्यासाठी वनक्षेत्रपाल यांनी हवेत गोळीबार केला. चौघा संशयितांच्या मुसक्या बांधण्यास वन पथकाला यश आले. बिबट्याची संपुर्ण कातडीदेखील जप्त केली.

मोखाड्याच्या काही संशयितांनी बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी शिकार केल्याची गोपनीय माहिती इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांना याबाबत कळविले. महिनाभरापासून संशयितांचा माग काढत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. कातडीच्या खरेदीसाठी हिंदीभाषिक ग्राहक असल्याचे भासवून बिरारीस यांनी तस्करांशी संपर्क साधला. सुरुवातीला सोमवारी ठरल्यानुसर बिरारीस यांनी गर्ग व पवार यांच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म पद्धतीने कारवाईचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला.

सुरुवातीला तस्करांनी घोटीमध्ये येण्यास सांगितले. तेथून पुन्हा पत्ता बदलून थेट त्र्यंबकेश्वरजवळ बोलविले. आंबोली फाट्यावर एका शेतात खरेदीचा बनाव बिरारीस व त्यांच्या पथकाने सुरु केला. कातडी ताब्यात घेत रक्कम देत असताना अचानकपणे तस्करांनी दगडांनी पथकावर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या झटापट व मारहाणीत दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही झटापट रोखून संशयितांना वाहनांत डांबण्यासाठी बिरारीस यांनी स्वत:जवळील पिस्तुलने हवेत दोन फैरी झाडल्या. यानंतर चौघांना ताब्यात घेण्यास पथकाला यश आले आहे. चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ---इन्फो--मोखाड्याच्या पाड्यांमधून तस्करी?

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे चाैघे संशयित हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवाशी आहेत. संशयित आरोपी प्रकाश लक्ष्मण राऊत (४३,रा.रांजणपाडा), परशुराम महादु चौधरी (३०,रा.चिंचुतारा), यशवंत हेमा मौळी (३८,रा.कुडवा), हेतु हेमा मौळी (३८) या चौघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. या वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी बिरारीस हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकleopardबिबट्याSmugglingतस्करी