शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात महिला वकिलाचीही तक्रार; खंडणी वसुलीवर FIR दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 11:11 IST

Sameer Wankhede in Trouble: मुंबई पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की आम्हाला तक्रार मिळाली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. 

मुंबई पोलिसांच्या वकील सुधा द्विवेदी (Sudha Dwivedi) यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडेंसह (Sameer Wankhede) अन्य पाच जणांविरोधात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथितरित्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे. ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात (Mumbai Police) आणि संयुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे तसेच राज्य भ्रष्टाचार निर्मूलन ब्युरो यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे, प्रभाकर साईल, के.पी. गोसावी सह पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. एका अन्य अधिकाऱ्याने म्हटले की आम्हाला तक्रार मिळाली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. 

ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांचीही मागणीज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवीत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहाजणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटितपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले. त्याच्या वडिलांकडून  कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

या सर्व प्रकरणात  वानखेडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाण्यातही तक्रार अर्ज दिला आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी