शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:54 IST

पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ‘ए परशा, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतोस काय?’ असे म्हणत वकील आणि रुकडीचा माजी उपसरपंच अमितकुमार भोसले  याने न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात शुक्रवारी प्रशांत कोरटकरच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या कोरटकरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर त्याला न्यायालयाबाहेर नेण्यात येत होते. त्यावेळी प्रवेशद्वाराजवळच वकील अमितकुमारने कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला. दहा ते बारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आवारातील कँटीनमध्ये नेले. त्याने पुन्हा घोषणा देण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याचे तोंड दाबले. पोलिसांना चकवा देऊन आंदोलनाच्या प्रयत्नात असलेला आणखी एक सामाजिक कार्यकर्ता जयदीप शेळके यालाही पोलिसांनी शुक्रवारी  ताब्यात घेतले.  

३० मार्चपर्यंत कोठडी

कोरटकरला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी शुक्रवारी कोल्हापूर पोलिसांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

चंद्रपूरच्या बुकीमालकाची आलिशान कार दिमतीला

चंद्रपूरचा बुकीमालक धीरज चौधरीची आलिशान कार कोरटकर लपण्यासाठी वापरत होता. तो फरार असताना तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांत होता. तो बुकीमालकासह अन्य चारजणांसोबत संपर्कात असल्याचे  निष्पन्न झाले. 

आश्रयदाते किती?

फरार काळात कोरटरकर प्रशिक पडवेकर (रा. नागपूर), धीरज चौधरी (रा. चंद्रपूर), हिफाजतअली, राजेंद्र जोशी (रा. इंदोर), साईराज पेंटकर (रा. करीमनगर) यांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोरटकर गुन्ह्यातील संशयित असूनही त्याला त्यांनी आश्रय दिला, अशी माहिती सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयासमोर दिली. 

धसका ‘कोल्हापुरी’चा 

कोरटकरला कोल्हापुरी पायताणाचा हिसका दाखवू, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती. 

कोल्हापूर पोलिस चंद्रपुरात 

नागपूर/चंद्रपूर : कोरटकरने त्याला मदत करणाऱ्या पाच जणांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून, त्यांची सखोल चौकशी होणार आहे. त्यात नागपुरातील तीन सहकाऱ्यांचा समावेश आहे. कोरटकर ११ ते १५ मार्चदरम्यान चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे लपून होता.

टॅग्स :Courtन्यायालय