शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:55 IST

२४ दिवसांत शहरात मध्यवर्ती भागात चार खुन पाथर्डी, सातपरमध्ये भयावह वातावरण, एकापाठोपाठ गन्हेगारी घटनांमुळे परिसर हादरला

सातपूर - सात महिन्यांपूर्वी सटाणा येथील कंधाणे येथून कामधंदा करण्यासाठी सातपूरला आलेल्या जगदीश परशराम वानखेडे (२३, रा. श्रमिकनगर) याला जीव गमवावा लागला आहे. काही टवाळखोरांनी बुधवारी (दि.२४) रात्री त्याला रस्त्यात अडवून कुरापत काढत धारदार शस्त्राने वार करत खून केला. सातपूरकरांचा दिवस उगविला तो या कामगाराच्या खुनाच्या बातमीनेच. सातपूर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य यादव (२१) याच्यासह दहा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी जगदीश हा त्याचा मित्र मयूर निकम याच्यासोबत दुचाकीने रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडे जात होता. यावेळी रस्त्यात त्यांना काही टवाळखोरांच्या टोळीने रोखले. कुठलेही एक कारण नसताना कुरापत काढत जगदीशच्या कानशिलात लगावली. गाडी नीट चालवता येत नाही का? असे म्हणत जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. टोळक्याने खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शस्त्रे काढून जगदीशच्या छातीवर आणि पाठीत सपासप वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मयूर व त्याचा दुसरा मित्र अजय याने काही नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत जगदीश यास शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळेतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

भरदिवसा कॅफेमध्ये यवकाला भोसकले

दुसरीकडे पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये बसलेल्या युवकावर गुरुवारी (दि. २५) पूर्ववैमनस्यातून चॉपर, कोयत्यांनी सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना भरदिवसा घडली. या हल्ल्यात राशिद हारुन खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. घटना घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृताच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.

अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर व खाडीच्या भागात राहणाऱ्या राशिद याच्यासोबत त्याच भागातील 'गॅस गैंग'मधील टोळक्याने काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशिद हा त्याच्या मैत्रिणीने बोलविल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या युवतीने मारेकऱ्यांना तो आल्याबाबतची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर, कोयत्याने राशिदवर वार केले.

शहरात आतापर्यंत ३७ खून

आतापर्यंत शहरात ३७ खून झाले आहेत. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव काळात बारा तासात सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दोन खून झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती २० दिवसांनी गुरुवारी नवरात्रोत्सवात झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Shaken: Two Murders in 12 Hours Spark Security Concerns

Web Summary : Nashik reels from two broad daylight murders within 12 hours. A young worker was fatally attacked in Satpur, while another was killed in a cafe due to prior disputes. Police are investigating both cases amidst rising public safety concerns.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी