शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 22:16 IST

या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.

ठळक मुद्देअहवालानुसार या संघटनेचे बांग्लादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. यापूर्वी या दशतवादी संघटनेने आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव ‘विलायह ऑफ हिंद’ असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं.

बंगळुरू -  दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, केरळ आणि कर्नाटकात ISIS च्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत  हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.आयएसआयएस, अल कायदा व त्यासंबंधित व्यक्ती व संस्था यांच्याशी संबंधित विश्लेषक सहाय्य आणि प्रतिबंध देखरेख पथकाच्या 26 व्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील अल-कायदा (एक्यूआयएस) अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद आणि कंधार प्रांतातील तालिबानअंतर्गत कार्यरत आहे. त्यात म्हटले आहे की, 'अहवालानुसार या संघटनेचे बांग्लादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. मारला गेलेला असीम उमरची जागा घेणारा ओसामा महमूद हा एक्यूआयएसचा सध्याचा मुख्य सूत्रधार आहे. असे अहवाल आहेत की, एक्यूआयएस आपल्या माजी आकाच्या (गुरु) मृत्यूचा बदला घेण्यासाठी या भागात सूड उगवण्याचा कट रचत आहे.

या अहवालानुसार '10 मे, 2019 रोजी घोषित करण्यात आलेल्या आयएसआयएलच्या भारतीय सहयोगी (हिंद विलायह) मध्ये 180 ते 200 सभासद आहेत, अशी माहिती एका सदस्य राष्ट्राने दिली आहे.' त्यात म्हटले आहे की, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ISIL चे महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. ' गेल्या वर्षी मेमध्ये इस्लामिक स्टेट (ज्याला आयएसआयएस, आयएसआयएल आणि देश असेही म्हटले जाते) दहशतवादी संघटनेने भारतात नवीन 'प्रांत' स्थापन केल्याचा दावा केला होता. काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीनंतर ही एक वेगळीच घोषणा केली होती.

यापूर्वी या दशतवादी संघटनेने आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव ‘विलायह ऑफ हिंद’ असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता. यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचे टार्गेट होतं. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

टॅग्स :terroristदहशतवादीISISइसिसKeralaकेरळKarnatakकर्नाटक