कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली; बहुजन विकास आघाडीच्या दोघा माजी नगरसेवकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:39 PM2021-10-08T17:39:10+5:302021-10-08T17:40:16+5:30

जमिन व्यवहाराच्या मूळ साठे करारात बदल करत खोट्या सह्या करून फेरफार करून फसवणूक केल्याचं प्रकरण

Land worth crores of rupees; A case has been registered against six persons, including two former corporators of Bahujan Vikas Aghadi | कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली; बहुजन विकास आघाडीच्या दोघा माजी नगरसेवकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली; बहुजन विकास आघाडीच्या दोघा माजी नगरसेवकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

आशिष राणे,वसई 
 

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई पूर्व बाफाणे येथील कोट्यावधी रूपयांची जमीन बनावट दस्त खोट्या सह्या करून हडप केल्याप्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दोन माजी नगरसेवकांसहित अन्य सहा जणावर मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वसई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अली सिद्धिकी (५७) रा. मुंबई यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मा.न्यायालयाच्या आदेशानुसार सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी वसई पोलीस ठाण्यात गु.रजि.क्रं. ३४८/२०२१ अन्वये ८ आरोपींवर भा.दं.सं.कलम  ४२०,४४७,४६५,४६७,४६८,४७१,आणि १२० (ब ) प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मुंबई चांदिवली येथे राहणारे फिर्यादी अली सिद्धीकी (५७) यांची वसई तालुक्यातील मौजे बाफाणे येथे सर्व्हे क्रं. ३६ हिस्सा क्रं.१ मधील क्षेत्र १२. ४ मी. मालकीची जमीन २०२० साली कायम खरेदी खताने शशिकांत म्हात्रे रा. वसई आणि राजेश नंदा यांना विक्री केली होती
मात्र धीरज पाटील याने पुर्वीच ही जमीन २०१८ मध्येच विक्री केल्याचे व त्या बदल्यात फिर्यादी सिध्दीकी यांनी २५ लाख रुपये घेतल्याचा रोखीचा एक खोटा करार त्यांच्या बनावट सहीने खोटा साठे करार ही तयार करण्यात आल्याचा बनाव करण्यात आला आहे.

याउलट गंभीर म्हणजे फिर्यादि सिद्दीकी यांच्या मालकीचे सर्व्हे क्रं.३६,३८,३९,४०,४१ मधील ४३८ गुंठे जमीन आरोपी रमेश जयराम घोरकाना, मिलिंद जगन्नाथ घरत ,प्रवीण प्रकाश गावरे,हनिप इब्राहिम शेख सर्व रा. वसई यांना जमीन विकली असल्याचा साठे करार रद्द केला असताना मूळ साठे करारामध्ये २ चेक दिले असे नमूद असताना तसेच मुळ साठे करारावर फोटॊ न लावता सह्या केलेले असताना २ चेक एवजी ३ चेक दिले असे नमूद करून तसेच साठे करारावर फोटॊ लावून मूळ साठे करारात बदल करून खोटा व बनावट साठे करार करून सिध्दीकी यांची फसवणूक केली आहे

दरम्यान सिद्दीकी यांच्या तक्रारीत आपण असा कोणताही करार केला नाही तर आपली फसवणूक झाली म्हणूनच सर्व आठ जणांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यावर अखेर वसई पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याचे दाखल गुन्ह्यात म्हंटल आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे वसई पोलिसांनी सांगितले.

ही तर लोकप्रतिनिधीची संघटित गुन्हेगारी ;

या मौजे.बाफाणे जमीन प्रकरणातील दोघे जण हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षाचे तथा वसई विरार शहर महापालिकेतील माजी सभापती रमेश जयराम घोरकानां व माजी नगरसेवक मिलिंद जगन्नाथ घरत म्हणून हे दोघेही दि.२८ जून २०२० पर्यंत कार्यरत राहिलेले लोकप्रतिनिधी असून या आणि अशा संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पक्ष बदनाम झाला आहे.

वसई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींची नावे
१) धीरज आत्माराम पाटील रा.कामण ता.वसई
२) शहाबुद्दीन अब्दुल हमीद शेख रा.जोगेश्वरी
३) सिध्दार्थ रामेश्वर साहू रा.नालासोपारा (प)
४) रमेश जयराम घोरकाना रा.वालीव जि. पालघर
५) मिलिंद जगन्नाथ घरत रा.गवराईपाडा, वालीव
६) प्रवीण प्रकाश गावरे रा.फादरवाडी ,वालीव
७) हनिप इब्राहिम शेख रा. एवरशाईन,वसई (पू)
८) अब्दुल कादर अगवानी रा.युनिक पार्क ,मालाड 

Web Title: Land worth crores of rupees; A case has been registered against six persons, including two former corporators of Bahujan Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.