शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींची जमीन ५४ कोटींना खरेदी; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह १० जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:45 IST

जनहित डावलणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच- मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

डेहराडून: हरिद्वारमध्ये झालेल्या सुमारे ५४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने मंगळवारी दोन आयएएस अधिकारी व आणखी आठजणांना निलंबित केले. त्यामध्ये हरिद्वारचे जिल्हाधिकारी कर्मेन्द्र सिंग, तत्कालीन महापालिका आयुक्त वरुण चौधरी आणि उपविभागीय दंडाधिकारी अजयवीर सिंग यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दक्षता विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्याचाही आदेश दिला आहे. तसेच वरुण चौधरी यांच्या कार्यकाळात हरिद्वार महापालिकेने केलेल्या सर्व कामांचे विशेष लेखापरीक्षण करावे, जेणेकरून आर्थिक अनियमिततेची पूर्ण चौकशी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने ग्राम सराई येथील कचराकुंडीच्या शेजारील सुमारे २.३०७० हेक्टर जमीन ५४ कोटी रुपयांना खरेदी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. ही जमीन पूर्वी शेतीयोग्य होती, मात्र नंतर ही जमीन व्यावसायिक वापरासाठी असल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे तिची किंमत १५ कोटी रुपयांवरून थेट ५४ कोटी रुपयांवर गेली. (वृत्तसंस्था)

या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

  • कर्मेन्द्र सिंह - जिल्हाधिकारी व तत्कालीन प्रशासक हरिद्वार महापालिका
  • वरुण चौधरी - तत्कालीन आयुक्त, हरिव्दार महापालिका
  • अजयवीर सिंह- तत्कालीन उपजिल्हाधिकारी, हरिद्वार
  • निकिता बिष्ट - वरिष्ठ वित्त अधिकारी, हरिद्वार महापालिका
  • विक्की – वरिष्ठ वैयक्तिक सहायक
  • राजेशकुमार - रजिस्ट्रार कानूनगो, हरिव्दार तहसील
  • कमलदास –मुख्य प्रशासनिक अधिकारी, हरिद्वार तहसील

यापूर्वी निलंबनाची कारवाई झालेले अधिकारी

  • रविंद्रकुमार दयाल- प्रभारी सहायक नगरआयुक्त
  • आनंद सिंह मिश्रवाण- प्रभारी कार्यकारी अभियंता
  • लक्ष्मीकांत भट्ट- कर तसेच राजस्व अधीक्षक
  • दिनेशचंद्र कांडपाल- अवर अभियंता
  • वेदपाल - मालमत्ता विभाग लिपिक (सेवा विस्तार समाप्त)

‘जनहित डावलणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच’

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचारमुक्त कार्यसंस्कृती विकसित करणे हा आमचा उद्देश आहे. कोणताही अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो जनहित आणि नियम डावलत असेल, तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड