शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा वाद :तक्रार मागे घेण्यासाठी तरुणाला मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 08:14 IST

पडघाजवळील राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील फरार हल्लेखोरांनी तक्रारदारांनी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली.

भिवंडी : पडघाजवळील राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील फरार हल्लेखोरांनी तक्रारदारांनी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. यात सद्दाम चिखलेकर (२९) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.      त्याचे काका व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष जव्वाद चिखलेकर हेही हल्लेखोरांच्या रडारवर असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. हल्लेखोर त्यांचा सतत पाठलाग करीत असल्याने त्यांनी याविरोधात ठाणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मात्र पडघा पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप चिखलेकर यांनी केला आहे. चार महिन्यांपासून फरार असलेले आरोपी यासिन व अझरुद्दीन चिखलेकर या भावांसोबत सय्यम पटेल याच्या विरोधात दुचाकीला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सद्दाम याचे वडील मज्जिद यांचा यासिन व अझरुद्दीन यांच्यात मागील काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. या वादातून २० नोव्हेंबर २०२० रोजी या दोन्ही आरोपींनी मज्जिद व त्यांचा मुलगा अरबाज यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला होता. त्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून यासिन व अझरुद्दीन हे दोघेही फरार आहेत. दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी गावातील रौउफ रेहमान याने मज्जिद यांना भेटून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले होते. २५ मार्च रोजी सद्दाम हा कामासाठी रात्री दुचाकीवरून निघाला असता त्याच्या पाळतीवर असलेल्या कारने त्यास रस्त्यात गाठले. त्यानंतर सद्दाम हा तुळशी गावातील आपल्या जमिनीवर दुचाकी उभी करून थांबला असता पाळतीवर असलेली कार त्या ठिकाणी येऊन दुचाकीसह सद्दाम यास जोरदार धडक देऊन पसार झाली.त्यावेळी कुटुंबीयांनी पडघा पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांवर १७ ते १८ गुन्हे दाखलफरार हल्लेखोरांवर विविध पोलीस ठाण्यात १७ ते १८ गुन्हे दाखल आहेत .त्यामुळे त्यांनीच हा हल्ला केला असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र पाठवले आहे अशी माहिती काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष जव्वाद चिखलेकर यांनी दिली आहे. मलाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु असून सतत पाठलाग करण्यात येत आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी