शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा बटवा लंपास; १९ हजार रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:51 IST

वडखळ पोलिसांनी त्या मुलीची तपासणी केली असता, तिच्याकडे ९१ हजार ६९२ रु पयांची रोकड सापडली.

अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा ९१ हजार रुपयांच्या रोकडसहीत बटवा लंपास करण्यात आला होता. अलिबाग एसटी स्थानकातील वाहक, तक्र ारदार व अलिबाग व वडखळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आला. ही घटना सोमवारी घडली.

पुणे जिल्ह्यातील मारगासनी येथील आशा जाधव गणेशोत्सवाच्या सणानिमित्त १८ आॅगस्ट रोजी नातेवाइकासमवे सूप विकण्यासाठी अलिबागमध्ये आली होती. दिवसभर सूप विकून झाल्यावर अलिबाग एसटी स्थानकातील सिमेंट कठड्यावर कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. २३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी सूप विकून झाल्यावर, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झोपल्या. त्यांच्या बाजूच्या कठड्यावर एक मुलगीदेखील झोपली होती. २४ आॅगस्ट रोजी सकाळी उठल्यावर मुलगी दिसून आली नाही, तसेच अशा यांचा पैशांचा बटवाही गायब झाला होता. त्यामुळे तातडीने अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन

तक्र ार केली. ही बाब एसटीतील काही कर्मचाऱ्यांनाही समजली. अलिबाग आगारातून सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पनवेलकडे जाणाºया एसटीतील वाहक प्रसन्न पाटील प्रवाशांचे तिकीट फाडत असताना एका मुलीकडे पैशांचा बंडल दिसून आले. त्या मुलीकडे इतकी रक्कम कशी, असा प्रश्न प्रसन्न पाटील यांना पडला. त्यांना चालकाला एसटी वडखळ पोलीस ठाण्याकडे वळविण्यास सांगितली.वडखळ पोलिसांनी त्या मुलीची तपासणी केली असता, तिच्याकडे ९१ हजार ६९२ रु पयांची रोकड सापडली. तिला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. ही मुलगी १७ वर्षांची असून, ती पेण तालुक्यातील कांदळेपाडा येथे राहते, ती सराईत गुन्हेगार आहे. तिच्याविरोधात वडखळ व पेण पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस