शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेचे दागिने लंपास प्रकरण : चोरीप्रकरणी महिलेसह सोनाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 03:35 IST

वृद्धेच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी शेजारच्याच विंगमधील महिलेसह सोनाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली आहे.

मुंबई : वृद्धेच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी शेजारच्याच विंगमधील महिलेसह सोनाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली आहे.रुचिता सचिन तना (३८) आणि दीपक हस्तीमल साकरिया (४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यात रुचिता ही मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून, २०१९ रोजी चारकोप पोलीस ठाण्यात एका वृद्धेने त्यांच्या कपाटामधून साडे पाच लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, चारकोप पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष ११ चे प्रमुख चिमाजी आढाव यांचे पथकही याचा शोध करत होते. तपासादरम्यान यात रुचिताचा हात असल्याचे उघड झाले आणि तिला बुधवारी ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. तेव्हा तिनेच चोरी केल्याचे तिने कक्ष ११ च्या तपास अधिकाऱ्याकडे कबूल केले. त्यानुसार, तिच्या चौकशीत साकरिया या सोनाराचे नाव उघड झाले. त्याने रुचिताकडून चोरीचे सोने विकत घेत ते वितळविल्याचे तपासात उघड झाले.रुचिता ही तक्रारदार महिला राहत असलेल्या इमारतीच्या शेजारच्या विंगमध्ये भाडे तत्त्वावर राहते. तिच्या पतीचे चारकोपमध्ये चष्म्याचे दुकान आहे. गोड बोलून लोकांशी मैत्री करायची आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि ते परतही करायचे नाही.एखादी व्यक्ती पैसे मागायला गेलीच, तर तिला काही न काही भावनिक कारण सांगत टोपी लावायची, अशी रुचिताची कार्यपद्धती होती. अंधेरी पोलीस ठाण्यातही तिच्याविरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ अधिकाºयाकडून सांगण्यात आले.योगाच्या बहाण्याने चोरी...पीडित वृद्ध महिला ही पतीसोबत एकटीच राहत असल्याचे रुचिताला माहीत होते. या दोघी इमारतीत असलेल्या व्यायामशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी वृद्धेची नजर चुकवून रुचिताने पर्समधील त्यांच्या घराची चावी चोरली आणि त्यांच्या घरी गेली. त्यानंतर, त्यांच्या कपाटातून दागिने घेऊन पुन्हा व्यायामशाळेत परतली आणि त्यांची चावी पर्समध्ये ठेऊन दिली. तिच्यावर कोणी संशय घेऊ नये, म्हणून तिने ही शक्कल लढविली. मात्र, अखेर ती पोलिसांच्या तावडीत सापडलीच.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई