ठाणे, मुंबई परिसरातून वाहने चोरणारा लाल बादशाह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 08:46 PM2021-12-05T20:46:25+5:302021-12-05T20:46:33+5:30

चोरीच्या दोन रिक्षा हस्तगत : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Lal Badshah arrested for stealing vehicles from Thane, Mumbai area | ठाणे, मुंबई परिसरातून वाहने चोरणारा लाल बादशाह जेरबंद

ठाणे, मुंबई परिसरातून वाहने चोरणारा लाल बादशाह जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे आणि मुंबई परिसरातील वाहनांची चोरी करणारा लाल बादशाह ऊर्फ सानू सुरबे खान (२५, रा. इंदिरानगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचने अटक केली. त्याच्याकडून दोन रिक्षा जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी रविवारी दिली.

लाल बादशाहने दोन रिक्षांची चोरी केली असून, या रिक्षांच्या विक्रीसाठी नवीन ग्राहकांच्या शोधात तो असल्याची माहिती घोडके यांना मिळाली होती. हाजुरी येथील श्रीश सोसायटीच्या वॉल कंपाैंडजवळ या रिक्षा उभ्या असल्याचीही माहिती समोर आली. त्यावेळी सानू हा या रिक्षा विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याचे आढळले. चौकशीमध्ये त्यातील एक रिक्षा वागळे इस्टेट येथून तर दुसरी वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरातून (वसई-विरार मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय) येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

त्याला पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे यांच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख पाच हजारांच्या दोन्ही रिक्षा जप्त केल्या आहेत. त्याला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून चोरीच्या आणखीही काही घटना उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Lal Badshah arrested for stealing vehicles from Thane, Mumbai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.