मुंबई : बँकेच्या पॉलिसीचा बनावट लोगो, ई-मेल आयडी बनवत पॉलिसी नूतनीकरण करण्यात सूट देण्याचे प्रलोभन दाखवत ग्राहकाकडून पैसे उकळल्याचा प्रकार बांगूरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
१० टक्के सवलतीचे प्रलोभनआयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मालाडमधील शाखेतील उपाध्यक्ष विशाल काटकर यांच्या तक्रारीनुसार डिसेंबरमध्ये अभिषेक सिंग व त्याच्या साथीदारांनी आरोग्य विमा पॉलिसीचे ग्राहक सुबोध गुलाटी यांना पॉलिसीच्या नूतनीकरणामध्ये १० टक्के सवलत देण्याचे प्रलोभन दाखविले.
बनावट ई-मेल आयडीमार्फत त्यांच्याकडून दोनदा व्यवहार करत एकूण एक लाख ८० हजार ५९३ रुपये उकळले. याप्रकरणी काटकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारकांविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३१९(२), ३३६(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदविला.