शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेलात नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा; दुकली अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 20:24 IST

पायधुनी पोलिसांनी नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. भगीरथ त्यागी (२८) आणि झाकीर हुसेन (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देयातील फिर्यादी शामरोझ नदीम पठाण (२९) हा तरुण दुबई येथे काही वर्षे काम करून परत भारतात आला होता. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या शामरोझ हा परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात होता. या प्रकरणाची तक्रार पायधुनी पोलिसांत करताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासात यातील आरोपी हे उत्तर प्रदेश, नोएडा, झाशी येथील असल्याचे उघड झाले

मुंबई - उच्च शिक्षीत तरुणाला परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २ लाख ८५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दुकलीचा पायधुनी पोलिसांनी नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. भगीरथ त्यागी (२८) आणि झाकीर हुसेन (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.यातील फिर्यादी शामरोझ नदीम पठाण (२९) हा तरुण दुबई येथे काही वर्षे काम करून परत भारतात आला होता. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या शामरोझ हा परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याने नोकरी मिळवून देणाऱ्या वेबसाईटला माहिती दिली होती. मात्र यातील आरोपींनी खोटे ई मेल अ‍ॅड्रेस, खोटी वेबसाईड बनवून शामरोझसारख्या गरजू तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला होता. शामरोझ याचा अर्ज आरोपींनी वेबसाईटवर पाहिल्यानंतर त्याला वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून संपर्क करून त्याला सौदी अरबमधील जे डब्ल्यू मेरिएट या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो, असे आश्वासन दिले. मात्र त्यांनी यासाठी प्रोसेसिंग फी, विमानाची तिकीट, व्हिसा यासाठी २ लाख ८५, ३०० रुपये बँक खात्यात टाकायला लावले. मात्र शेवटी आरोपींनी नोकरीसाठी ७१, ८९६ रुपये जीएसटीच्या नावाखाली मागितल्याने शामरोझ याला त्यांचा संशय आला. त्याने या प्रकरणाची तक्रार पायधुनी पोलिसांत करताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासात यातील आरोपी हे उत्तर प्रदेश, नोएडा, झाशी येथील असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली असून त्यांची महिला साथीदार फरारी आहे.   

टॅग्स :Arrestअटकjobनोकरीhotelहॉटेलdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश