शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लेडिज बारमध्ये पैसे उधळणे आले अंगलट, कंपन्यांमध्ये चोरी करणारे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 02:40 IST

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये चोरलेल्या वस्तू विकल्यानंतर येणारा पैसा लेडिज बारमध्ये खर्च करणाऱ्या रियाज रमजान खानसह त्याच्या दोन साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली - शहरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये चोरलेल्या वस्तू विकल्यानंतर येणारा पैसा लेडिज बारमध्ये खर्च करणाऱ्या रियाज रमजान खानसह त्याच्या दोन साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांतील आठ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे उपस्थित होते.पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या कंपन्यांमधील कपड्यांचे गठ्ठे, फिल्टर प्लांट, इलेक्ट्रिक मोटार आदी माल चोरट्यांनी चोरला होता. या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस करत होते. यावेळी सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवायला पोलिसांनी सुरुवात केली. याच दरम्यान, लेडिज बारमध्ये पैसे खर्च करणाºया रियाज याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याच्या हालचालींवर पाळत ठेवणाºया पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी रफिक करम शेख, प्रकाश विठ्ठल सूर्यवंशी तसेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सहा गोदामे फोडून त्यातील ११ लाख रुपयांच्या मालाची चोरी केल्याची कबुली रियाजने पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी शेख व सूर्यवंशीला अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पोलीस निरीक्षक बाबासाहेब तांबे, नासीर कुलकर्णी (प्रशासन), पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे आदींनी ही कारवाई केली.सोनसाखळीचोरास बेड्या, मंगळसूत्र जप्तपादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पोबारा करणारा सुरज पलानी सामी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी