शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

बनावट कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:46 IST

भिवंडीतील घटना; चार जणांना केली अटक

 

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल तयार करून अवघ्या ५०० रुपयात विकणाऱ्या पॅथॅालॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केली.  रब्बनी अनवारूल हक सैयद (वय ३१), अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय २२) व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय २०) या तिघांना बुधवारी अटक केली. चौथा आरोपी मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय २९) याला गुरुवारी अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेने सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिarली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.भिवंडीतील शांतीनगर परिसरात आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोनाचे निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट अहवाल ५०० रुपयात बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला कळताच मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदिया शाळेसमोर असलेल्या महेफुज लॅबोरेटरी येथे बनावट ग्राहकाला निगेटिव्ह अहवाल घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणीकरिता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता निगेटिव्ह अहवाल थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट अहवाल देताना महेफुज लॅबमधील तिघांना पकडले. या लॅबची झडती घेतली असता आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ जणांचे अहवाल सापडले. त्यामध्ये ५९ हे निगेटिव्ह व ५ पॉझिटिव्ह होते. या प्रकरणी लॅब टेक्निशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची चौकशी केली असता त्यांनी हे बनावट अहवाल लॅबमध्ये मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या मदतीने तयार केल्याची कबुली दिली.भिवंडीतून परराज्यामध्ये जाण्यासाठी कामगारांना आरटीपीसीआर तपासणी अहवाल हा निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. प्रत्येक अहवाल हा कमीतकमी ५०० रुपये दराने बनावटरित्या थायरोकेअर या लॅबच्या लेटरहेडवर तयार केलेले आहेत. हे सर्व अहवाल मेहफूज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केले व दिल्याची कबुली दिली आहे.चाचणीसाठी परवानगी दिली नव्हतीnया आरोपींकडून पडघा परिसरातील कोशिंबी येथील साईधारा कंपाउंडमधील वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेले एकूण ५८९ स्वॅब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आय. सी.एम.आर.चे फॉर्म हे लॅबमध्ये सापडले. nयापूर्वी अनेक कंपन्यातील कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीचे बनावट अहवाल तयार करून विक्री केल्याचे तपासात समोर आली आहे. पोलिसांनी भिवंडी पालिकेकडून माहिती घेतली असता मेहफुज लॅब यांना आरटीपीसीआर तपासणीची परवानगी दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या