शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजक! 25 वर्षीय तरुणीशी 5 महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्या 45 वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 11:34 IST

Crime News : 25 वर्षीय तरुणीशी लग्न करणाऱ्या 45 वर्षांच्या व्यक्तीने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं.

नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक प्रेमासाठी काय पण करायला देखील तयार असतात. असे असंख्य हटके किस्से हे नेहमीच समोर येतात. काही जण आपल्यापेक्षा वयाने खूप जास्त असलेल्या लोकांना सोबत लग्न करतात. तर काही कमी वयाच्या लोकांशी लग्नगाठ बांधतात. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमधील एका कपलची यासाठीच जोरदार चर्चा रंगली होती. कर्नाटकमध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान असलेल्या एका 25 वर्षीय मुलीसोबत लग्न केलं होतं. 

20 वर्षीय लहान मुलीसोबत संसार थाटल्याने या लग्नाची तुफान चर्चा सर्वत्र होती. पण आता याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 वर्षीय तरुणीशी लग्न करणाऱ्या 45 वर्षांच्या व्यक्तीने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातील अक्कीमारी गावातील 45 वर्षांचा शंकराप्पाने 25 वर्षांच्या मेघनासोबत लग्न केलं. 5 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2021 ला दोघांनी लग्न केलं. सोशल मीडियावर त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ  व्हायरल झाले. 

कपल लग्नामुळे खूप प्रसिद्ध झाले. लग्नानंतरही हे कपल आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत होतं. पण आता लग्नाच्या 5 महिन्यांनंतर शंकराप्पाच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरामागील गार्डनमध्ये शंकरप्पा मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्याची पत्नी आणि आईचं भांडण असल्याचं सांगितलं जातं आहे. मेघना चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी