शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीत नेमकं काय होतं गुपित, २ पानं कोणी फाडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 12:31 IST

Kolkata Murder Case: कोलकाता येथील महिला ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेला ९ दिवस उलटून गेले तरी अनेक प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत.

कोलकाता येथील महिला ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेला ९ दिवस उलटून गेले तरी अनेक प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत. आता एका डायरीने या संपूर्ण प्रकरणाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. कोलकाता पोलिसांनी एक डायरी सीबीआयकडे सोपवली आहे. ही डायरी महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेमध्ये महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराला ९ दिवस उलटले आहेत. मात्र तपास सुरूच आहे. यावरून राजकारण सुरू आहे. ना प्रश्न संपत आहेत ना आरोपांची यादी संपत आहे. आता एक डायरी आणि तिची फाटलेली पानं यामुळे डॉक्टरांसोबत घडलेल्या भयंकर घटनेचा सीबीआयचा तपास आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.

कोलकाता पोलिसांनी एक डायरी सीबीआयकडे सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ ही डायरी सापडली आहे. पोलिसांनी सीबीआयकडे सोपवलेल्या डायरीची काही पानं फाडलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की, डॉक्टरांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीत नेमकी काय गुपितं लिहिली होती? डायरीची पानं फाडण्यामागचं कारण काय? 

ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांकडे साधारणपणे डायरी असते असं सांगितलं जात आहे. ज्यावर औषधांची नावं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. परंतु मृत डॉक्टरची डायरी फाडलेली आढळल्याने पुराव्याशी छेडछाड झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ठळक झाला आहे. मात्र, सीबीआय डायरीच्या अँगलबाबत जागरूक असून प्रत्येक बाजूने तपास करत आहे.

महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळून सापडलेली डायरी आणि तिची फाटलेली पानं यात काय गुपित आहे, हे सीबीआयच्या तपासातच उघड होईल. पण त्याआधी डॉक्टरच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांनी या डायरीसंदर्भात काही गोष्टी झी मीडियाशी शेअर केल्या आहेत. होय आम्हाला माहीत आहे. त्या पानांमध्ये काय होते याचा पुरावा आमच्याकडे आहे. पानं नाहीत पण फोटो आहे. आम्ही हे सांगणार नाही. आम्ही ते अद्याप सीबीआयला दिलेलं नाही. एकच पान आहे. सीबीआयने मागितल्यास आम्ही ते देऊ.   

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी