शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोल्हापूर हादरलं! स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी; पंचक्रोशीत संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:33 IST

कागल तालुक्यातील सोनाळी येथील घटना; आरोपीस ताब्यात देण्याची मागणी

- अनिल पाटीलमुरगूड, कोल्हापूर: स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी (ता. कागल) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नाव आहे. त्याचे सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली. परंतू पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आले, त्याचा मृतदेह सोनाळी (ता.कागल) येथील डोंगरात मिळून आल्याने पंचक्रोशीतील नागरिक व महिलांतून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारला.

वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवार (दि. १७ ऑगष्ट) रात्री साडे आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला. रात्रभर व दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला याबाबत तर्क वितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुण्या माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती. तोच अंदाज खरा ठरला.