शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाला गालबोट, तिघांवर चाकू हल्ला; आरोपीला ताब्यात द्या, गावकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 09:21 IST

पोलीस पाटलासह दोन नागरिकांवर चाकू हल्ला, जमावाने पोलिसांची गाडी फोडली

चंद्रपूर-  गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी घटना चंद्रपुर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात सकमुर येथे मंगळवारी रात्री घडली. सकमूर गावातील पोलीस पाटील व इतर दोन नागरिकांवर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी गावकरी करत होते. त्यांची समजूत काढताना पोलिसांची दमछाक झाली. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनाची हवा सोडली. त्यामुळे पोलिसांना गाडी घेऊन निणे अवघड झाले.

आरोपी इरफान शेख सकमुर जवळ गुजरी या गावात अवैध दारू विक्री करतो. मागील आठ वर्षापासून यांचे कुटुंब येथे वास्तव्यास आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा लोकांना धमकावल्याचा, मारहाण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इरफान शेखने गणपती मिरवणुकीत शुल्लक कारणावरून नाचताना धक्का लागल्याच्या गोष्टीवरून तुळशीराम काळे पोलीस पाटील, मोहन तांगडे, विभाकर शेरके यांच्यावर सहकाऱ्यांना घेऊन चाकूने हल्ला केल्यामुळे गावकरी संतप्त झाले होते. पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले. पण त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थ करत होते.

सकमूरवासीयांनी पोलिसांच्या गाडीजवळ गर्दी केली होती. गर्दीला शांत करण्यासाठी घटनास्थळी लाठी, धाबा येथील पोलिसांचा ताफा बोलावण्यात आला. त्यापैकी दोन गाड्यांच्या काचा संतप्त नागरिकांनी फोडल्या. मुख्य आरोपी इरफान शेख याच्यासह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर त्याच्या साथीदारांचा शोध घेणे सुरू आहे. लाठीचे ठाणेदार सहारे पुढील तपास करीत आहे.

एसडीपीओ यांच्या वाहनाला घेराव

अटक झालेल्या दोन आरोपींना एसडीपीओ राजुरा साखरे हे आपल्या वाहनांमध्ये घेऊन जात असताना नागरिकांनी त्यांना घेराव घातला गर्दीतून वाहन काढताना एका नागरिकाच्या पायावरून चाक गेल्याने त्याचे पाय तुटके गंभीर जखमी झाला 

पोलिसांचे वाहन थांबवून मारहाण

दोन आरोपींना गावकऱ्यांनी पोलिसांचे वाहन थांबवून मारहाण केली. त्यांची गंभीर स्थिती आहे व जखमी पोलीस पाटील व गावातील २ नागरिक गंभीर आहे.

एसपी रात्री  तीन वाजता घटनास्थळी...

चंद्रपूरचे एसपी सुदर्शन मुम्मका परिस्थिती हाताळण्यासाठी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचले. सकमुर व गुजरी येथील नागरिकांचा रोष होता की सर्वसामान्यांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या. शिक्षा आम्ही देऊ या भूमिकेमुळे  नागरिकांनी पोलिसांच्या गाडीच्या काचाही फोडल्या परंतु एसपींनी नागरिकांचे समाधान करत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी तीन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देत पोलिसांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.