शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक विधी केल्याच्या रागात अल्पवयीन मुलाची बालगृहातच हत्या; माटुंगा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 07:53 IST

याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : माटुंगा येथील बालगृहातील कक्षात नैसर्गिक विधी केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी केलेल्या मारहाणीत एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरत असलेल्या १६ वर्षीय मुलाला डी. बी. मार्ग पोलिसांनी ६ ऑगस्टला माटुंगा येथील डेव्हीड ससून औद्योगिक शाळा/ बालगृहात ठेवले. कोरोनाच्या नियमामुळे त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथेच मारहाण करणारे अन्य ४ तरुण होते. त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते. तसेच तो नेहमी शांत राहायचा. १६ ऑगस्टला त्याने कक्षातच नैसर्गिक विधी केली. याच रागात चौघांनी त्याला मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. 

सायंकाळी ७ वाजता वॉर्डन महिला तेथे जाताच त्यांना संबंधित मुलगा बेशुद्धावस्थेत दिसला. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात हलवले. मात्र, त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले.

कोण आहेत आरोपी?

सीसीटीव्हीमध्ये त्याला मारहाण झाल्याचे उघड झाले. त्यानुसार, चारही मुलांकडे चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  चारही जणांची रवानगी डोंगरीच्या  बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यामध्ये १२, १५, १६ आणि १७ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी