शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

जेवणाची भांडी धुतली नसल्यावरून बोलल्याने सहकाऱ्याची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 21:41 IST

भाईंदरच्या चौक समुद्रात मासेमारी बोटीवरील घटना

मीरारोड - भाईंदरच्या चौक जवळील समुद्रात मासेमारी बोटीवर जेवणाची भांडी धुण्यास सांगितल्याने एका खलाशाने सहकारी खलाशाच्या डोक्यात मासेमारी जाळे ओढण्याचा रॉड मारुन समुद्रात फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तन पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.लेन्सन कतवार यांनी प्रलयकर ही मासेमारी बोट भाड्याने घेतली असून त्या बोटीवर संतु राम हरीराम (३४), तुनियाराम गोविंदराम (३२),गिरीवर वसुदेव (४६), रामास्वामी भुवनेश्वर श्रीवास (२८) हे खलाशी काम करतात. यातील रामास्वामी हा बोटीवरची कामे करत नसल्याने त्याला संतु बोलायचा. त्यावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे.सदर बोट चौक धक्का पासुन लांब समुद्रात असताना २१ सप्टेंबर रोजी रात्री ११च्या सुमारास बोटीवर जेवण केले. संतुने जेवणाची भांडी रामास्वामीला धुण्याास सांगीतली असता त्याने नकार दिला. संतुने बडबड केली असता रामास्वामीने त्याला ओढत बोटीच्या केबिन जवळ नेले. तेथे मासेमारी जाळे ओढण्यासाठी असलेल्या लोखंडी रॉडने संतुच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केला. तुनियाराम व गिरीवर वाचवण्यास गेले असता दोघांना मारण्याची धमकी दिल्याने ते पुढे गेले नाहीत. रामास्वामीने रक्तबंबाळ संतुला बोटीवरुन समुद्रात फेकुन दिले.संतु बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह चौक धक्का जवळ पाण्यात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी बोटीची पाहणी केली असता त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. संतुची हत्या बोटीतच झाल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी तुनियाराम व गिरीवरकडे चौकशी केली असता त्यांनी घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी रामास्वामीला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिल्याचे उपनिरीक्षक सुरज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.