शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत डोक्यात दगड घालून, गळा चिरून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:06 IST

Crime News:

 मिरज (जि. सांगली) : मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ समतानगर येथे गोविंदा मुत्तीकोळ (वय ४०) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री गोविंदा मुत्तीकोळ याचा खून करून हल्लेखोर पसार झाले.

आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत तरुणाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. अंमली पदार्थाचा व्यसनी गोविंदा आई सोबत समतानगर येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे जुन्या हरिपूर रस्त्यावर दोन ते तीन हल्लेखोरांनी निर्घृणपणे गोविंदाचा खून केला. धारदार हत्याराने त्याचा गळा चिरून डोक्यात दगड घालून  खून करण्यात आल्याचे दिसून आले. 

 घटनास्थळी गांधी चाैक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही. गोविंदा याच्यासोबत रात्री असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनी मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याचा खून करण्यांत आल्याचा संशय आहे. मिरजेतील समतानगर माणिकनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ होत असून दोन दिवसापूर्वी येथे गुन्हेगांरांच्या टोळक्याने खंडणीसाठी समीर शेख या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस