शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पवित्र नात्याला मार गोळी; आपण रिलेशनमध्ये येऊ! १६ वर्षीय विद्यार्थीनीकडे शिक्षकाची अजब मागणी, गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: October 19, 2022 19:04 IST

Crime News: गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम मोर्शी येथील एका ४३ वर्षीय शिक्षकाने केले आहे. ‘त्या’ पवित्र नात्याला मार गोळी; आता रिलेशनमध्ये येऊ! असे म्हणाणाऱ्या शिक्षकाचे ते वेगळे रूप पाहून ती नखशिखांत हादरली.

- प्रदीप भाकरेअमरावती -  जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो. तो गुरू होण्याच्या प्रक्रियेला सुरवात करतो. ही ऊर्जा असते ‘तू करू शकतो’ या मानस प्रक्रियेची... भारतीय तत्त्वज्ञानात शिक्षकाला असे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, त्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम मोर्शी येथील एका ४३ वर्षीय शिक्षकाने केले आहे. ‘त्या’ पवित्र नात्याला मार गोळी; आता रिलेशनमध्ये येऊ! असे म्हणाणाऱ्या शिक्षकाचे ते वेगळे रूप पाहून ती नखशिखांत हादरली. मनाचा हिय्या करत तिने १८ ऑक्टोबर रोजी वरूड पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली.

प्रवीण कृष्णराव धोटे (४३, रा. महादेव कॉलनी, मोर्शी) असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरूध्द वरूड पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व ॲट्रासिटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. यातील १६ वर्षीत पिडिता ही विद्यार्थीनी असून, आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. ती वरूड येथे शिक्षण घेत असताना तिची आरोपीशी ओळख झाली. दरम्यान आरोपीने यंदा तिची ॲडमिशन अमरावतीच्या तंत्रनिकेतन विद्यालयात करून दिली. त्यामुळे दोघांमध्ये संवाद देखील वाढला. मात्र त्या थोराड शिक्षकाने चुकीचा अर्थ घेतला. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी ती वरूड बसडेपोत असताना आरोपीने तिच्या मोबाईलवर कॉल केला.

म्हणाला खुप आवडतेसआपल्यापेक्षा तब्बल १७ वर्षांनी लहान असलेल्या त्या मुलीला त्याने कॉल करून आता आपल्यातील शिक्षक विद्यार्थीनीचे नाते संपवून टाकू. मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे आहे, असा तो बरळला. खुप आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे, असेही तो म्हणाला. त्यानंतर देखील वारंवार कॉल करून त्याने तिला त्रास दिला. व्हॉटसॲपवर चॅट करून देखील तिचा विनयभंग करण्यात आला. त्या असहय जाचाला कंटाळून अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौेगावकर हे करीत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी