शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचे अपहरण, उपराजधानीत प्रचंड खळबळ; भयावह मागणीमुळे पोलीसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 02:15 IST

Crime news: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका शाळकरी मुलाचे एका दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले.

- नरेश डोंगरेनागपूर : शाळकरी मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांने मुलाच्या सुटकेच्या बदल्यात नात्यातील एका व्यक्तीच्या शिराची (मुंडके) मागणी केल्याचे प्रचंड खळबळजनक वृत्त आहे. अपहरणकर्त्यांच्या या मागणीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका करून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपराजधानीतील अवघी पोलिस यंत्रणा कामाला लावतानाच आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही अलर्ट दिला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात कोणताही अधिकारी काहीही सांगायला तयार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका शाळकरी मुलाचे एका दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी चिंतित झाली होती. मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्याच्या विचारात असतानाच अपहृत मुलाच्या पालकांना अपहरणकर्त्याचा फोन आला. 'तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, त्यांची सुखरूप सुटका करायची असेल तर अमुक एका व्यक्तीचे शीर आणून द्या', अशी भयंकर मागणी अपहरणकर्त्यांनी पालकांकडे केली. ही मागणी इतकी भयावह होती की, पालकांना दुसरा पर्यायच उरला नाही. सुन्न पडलेल्या पालकांकडून एमआयडीसी पोलिसांना ते कळविण्यात आले. ही विचित्र तेवढीच भयंकर मागणी ऐकून पोलीसही हादरले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. मुलाचे अपहरण आणि अपहरकर्त्याची भयंकर मागणी ऐकून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. अवघी पोलीस यंत्रणा सक्रियही धक्कादायक घडामोड कळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेसह सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपहृत मुलगा तसेच अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी कामी लावले.आजूबाजूच्या जिल्ह्यात अलर्ट नागपूर जिल्ह्याला जोडून असलेल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातही यासंबंधीची माहिती देऊन आरोपी तसेच अपहृत मुलाच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा कामी लावली. मध्यरात्रीपर्यंत या संबंधाने पोलीस प्रयत्नशील होते.अपहरणकर्ता संपर्कातीलचया प्रकरणातील अपहरणकर्ता पीडित कुटुंबाच्या संपर्कातील असावा, असा दाट संशय आहे. त्याला शोधून काढण्यासाठी नागपूर शहर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणाही कामी लागल्या होत्या.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर