शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणप्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:18 IST

दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली.

ठाणे : दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली. त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सुरेंद्रचे मुंबईच्या नाहूर रोड येथील एका चोवीसवर्षीय तरुणीवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला तिच्या वडिलांचा विरोध होता. त्यांचे लग्नही होणार होते. १९ जुलै रोजी तो दिव्यातच भाड्याने रूम घेण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु, त्याचवेळी ठाण्याच्या तीनहातनाका येथून त्याचे अपहरण झाले. त्याला एका गाडीतून नेण्यात आले. नारंगीकर यांच्या घरातच त्याला मारहाणही झाली. त्यानंतर मात्र तो गायब झाला. याबाबत सुरुवातीला नौपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. परंतु, त्याचा पयासीपूर (उत्तर प्रदेशातील) येथील भाऊ वीरेंद्र मिश्रा याने या संपूर्ण प्रकरणात संशय व्यक्त करून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार २९ जुलै २०१८ नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.नागरगोजे यांनी ठाणे न्यायालयातून या प्रकरणात गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातील अन्यही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा