नालासोपारा - पूर्वेकडील दुकानात काम करणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने पायातील चप्पल चोरल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने फिनाईल पाजून गाडीमध्ये बसवून विरार परिसरात नेऊन सोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. अपहरण झालेल्या पीडित मुलाने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितल्यावर शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. पूर्वेकडील डिमार्ट जवळील परिसरातील किराणामालाच्या दुकानात काम करणारा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वृन्दावन रेसेडन्सी इमारतीमधील एका घरामध्ये पाण्याची बाटली देण्यासाठी मंगळवारी गेला होता. पाणी देऊन इमारतीमधून खाली उतरत असताना डी/402 मध्ये राहणाऱ्या सुमित दुबे याने त्याला अडवले व त्याच्या पायातील चप्पल बघून माझ्या घराबाहेरील माझी चप्पल का चोरली अशी विचारणा करून रागाच्या भरात पीडित मुलाच्या खिशातील 600 रुपये आणि मोबाईल काढून घेतला. नंतर सुमित दुबे याने व त्याच्या 6 साथीदारांनी मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला फिनाईल पाजून दुखापत करत त्याला विरार रेल्वे स्टेशन परिसरात सोडून निघून गेले.
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पाजले फिनाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:18 IST
अपहरण झालेल्या पीडित मुलाने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितल्यावर शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पाजले फिनाईल
ठळक मुद्दे14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वृन्दावन रेसेडन्सी इमारतीमधील एका घरामध्ये पाण्याची बाटली देण्यासाठी मंगळवारी गेला होता. सुमित दुबे याने व त्याच्या 6 साथीदारांनी मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला फिनाईल पाजून दुखापत करत त्याला विरार रेल्वे स्टेशन परिसरात सोडून निघून गेले.