झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्या मुलीचा बळी दिला. अंधश्रद्धेच्या पोटी सहा वर्षांच्या एकुलत्या एका मुलीला फक्त मुलगा हवा म्हणून बापाने ठार मारले. ही घटना पेशरार प्रखंड मुख्यालय पंचायतच्या बोंडोबार गावची आहे.सुमन नागेसियाने बोंडोबार गावात मुलाच्या हव्यासापोटी आपल्या सहा वर्षाच्या मुलीचा बळी दिला. काही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी सुमनला सांगितले की, त्यांने मुलीचा बळी दिला तर मुलगा होईल. या अंधश्रद्धेत त्याने आपल्या मुलीचा बळी दिला.आरोपी 26 वर्षीय सुमन नागेसिया अशिक्षित आहे. तो रोजीरोटीसाठी दुसर्या राज्यात गेला होता. त्याच वेळी, तेथे पुत्र प्राप्तीबाबत चर्चा झाली होती आणि त्याने सांगितले होते की, त्याला सहा वर्षांची मुलगी आहे आणि मुलगा नाही. मुलासाठी काय करावे लागेल. मुलाच्या अभावी सुमनने भगत वगैरेला बोलावले आणि घरीच पूजाअर्चा केली आणि अंगणात मुलीचा बळी दिला. आपल्या मुलीचा बळी दिल्यानंतर 26 वर्षीय सुमन नागेसियाच्या पत्नीच्या काळजाचे तुकडे तुकडे झाल्याप्रमाणे रडत होती.नक्षलग्रस्त आणि कडाग्रस्त भाग असल्याने ग्रामस्थांनी सुमनला जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेल्या किस्को ब्लॉक मुख्यालयात आणले. त्यानंतर पेशारार पोलिसांनी तेथे पोहोचून सुमनला अटक केली. मुलीच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या पुढील स्वाधीन करण्यात आला आहे.सुमनची पत्नी, 21 वर्षीय फुलमानिया नागेसिया भीतीने सिकरगड, पाखर येथे आपल्या गावी गेली आहे. अंधश्रद्धा पसरवणारा कुठल्या गावाहून आला हे समजू शकले नाही. अंगणात पूजा केल्यानंतर सुमनने आपल्या मुलीचा सुषमाचा बळी दिला, असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी सुमनला लोहरदगा मंडळाच्या तुरूंगात पाठविले आहे.
अंधश्रद्धेचा बळी ठरली चिमुकली! मुलाच्या हव्यासापोटी ६ वर्षाच्या मुलीची केली हत्या
By पूनम अपराज | Updated: November 14, 2020 19:16 IST
superstition : सुमन नागेसियाने बोंडोबार गावात मुलाच्या हव्यासापोटी आपल्या सहा वर्षाच्या मुलीचा बळी दिला.
अंधश्रद्धेचा बळी ठरली चिमुकली! मुलाच्या हव्यासापोटी ६ वर्षाच्या मुलीची केली हत्या
ठळक मुद्देआपल्या मुलीचा बळी दिल्यानंतर 26 वर्षीय सुमन नागेसियाच्या पत्नीच्या काळजाचे तुकडे तुकडे झाल्याप्रमाणे रडत होती.