पाली : सुधागड तालुक्यात अंधश्रद्धा काळीजादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणाºया सात जणांना ताब्यात घेतले आहे.काही महिन्यापूर्वी सुधागड तालुक्यात कोट्यवधींच्या मांडुळाची तस्करी करणाºयांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी करणाºयांवरही वनविभागाने कारवाई केली होती. खवल्या मांजराची तस्करी करणाºया सात जणांना वनविभागाने ताब्यात घेतले असून पाली दिवाणी न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना सुधागडमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:28 IST