शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

केरळच्या सोने तस्करीत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग; मुख्य आरोपीचा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:59 IST

स्वप्ना सुरेश यांनी कोर्टात मुख्यमंत्री, त्यांचे माजी प्रमुख सचिव एम. शिवशंकर, विजयन यांची पत्नी कमला, मुलगी विना, खासगी सचिव सी.एम रवींद्रन यांची नावं घेतली.

सोने तस्करी प्रकरणी केरळ कोच्चीच्या कोर्टात मुख्य आरोपी असलेली स्वप्ना सुरेशला हजर करण्यात आले. यावेळी तिने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. सोने तस्करीत मुख्यमंत्री विजयनही सहभागी असल्याचा दावा आरोपीने केला. २०१६ मध्ये विजयन दुबईत आले होते तेव्हा त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठवली होती असं तिने सांगितले. 

स्वप्ना सुरेश यांनी कोर्टात मुख्यमंत्री, त्यांचे माजी प्रमुख सचिव एम. शिवशंकर, विजयन यांची पत्नी कमला, मुलगी विना, खासगी सचिव सी.एम रवींद्रन यांची नावं घेतली. स्वप्नानं म्हटलं की, २०१६ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री संयुक्त अरब अमीरात येथे दौऱ्यावर आले होते. तेव्हा भारतीय दुतावासात मी सचिव होती तेव्हा शिवशंकर यांनी सर्वात आधी मला संपर्क साधला. मुख्यमंत्री त्यांची एक बॅग घ्यायला विसरले आहेत ती दुबईला घेऊन जायची आहे. आम्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती बॅग मुख्यमंत्र्यांकडे पोहचवली. मात्र या बॅगेत रोकड असल्याचं समोर आले होते. 

बाकी वेळ आल्यावर उघड करेनस्वप्ना म्हणाली की, शिवशंकर यांच्या सूचनेनुसार बिर्याणीची जड भांडी महावाणिज्य दूतावास ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या क्लिफ हाऊसपर्यंत नेण्यात आली. बिर्याणीशिवाय इतरही जड पदार्थ त्यात होते. मी आत्ताच सर्व काही सांगू शकत नाही. वेळ आल्यावर मी आणखी खुलासा करेन. स्वप्नाने दावा केला की तिने केंद्रीय तपास यंत्रणांना तपशीलवार पुरावे दिले असले तरी अजूनही काही भाग आहेत ज्यात तपासाची गरज आहे. 

काय आहे सोने तस्करी घोटाळा?५ जुलै २०२० रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिरुअनंतपुरम विमानतळावर UAE वाणिज्य दूतावासातील एका व्यक्तीकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३० किलो सोने जप्त केले. यूएई वाणिज्य दूतावासात काम करणाऱ्या सरित पीएसला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ​​व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले माजी वाणिज्य दूतावास कर्मचारी स्वप्ना सुरेश आणि एम शिवशंकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली. स्वप्नाने मैत्रीच्या बहाण्याने आपला विश्वासघात केल्याचा दावा शिवशंकरने आपल्या पुस्तकात केला आहे. याचा बदला म्हणून स्वप्नाने शिवशंकरवर अनेक आरोप केले आणि त्याने तिचा विनयभंग केला असल्याचं म्हटलं. सीमाशुल्क, ईडी आणि राज्य पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरेश आणि शिवशंकर यांना अटक करण्यात आली होती. सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर शिवशंकरची फेब्रुवारी २०२१ मध्ये आणि सुरेशची त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सुटका झाली.

टॅग्स :Goldसोनं